Maharashtra : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा प्रकरणात अजित पवार यांना व्हिलन ठरवण्यात आले. अजित पवार हा चांगला माणूस आहे, आम्हाला निधी देत नव्हते तरी मी हे म्हणतोय. एकदा मी स्वतः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असतांना त्यांच्याकडे निधीसाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट शब्दात तुम्ही आमच्या पक्षाचे नाही असे सांगितले होते.
तरी देखील मी त्यांना चांगला माणूस यासाठी म्हणतो कारण त्यांनी त्यांच्या पक्षाला आणि कार्यकर्त्यांना अधिक महत्व दिले, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अजित पवालांची भलावण केली. प्रसार माध्यमांशी बोलतांना शिरसाट यांनी बारसू रिफायनरी, संजय राऊत, अजित पवार, महाविकास आघाडी संदर्भात भाष्य केले.
शिरसाट म्हणाले, शरद पवारांच्या राजीनामा प्रकरणात अजित पवारांना (Ajit Pawar) व्हिलन ठरवण्यात आले, त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली, पण ते व्हिलन ठरले. माझा त्यांच्याबद्दलचा अनुभव चांगला नसला, ते वेगळ्या पक्षाचे नेते असले तरी माणूस म्हणून अजित पवार चांगला माणूस आहे. (Shivsena) महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सरपंचांना निधी दिला, साध्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निधी दिला, पण आम्हाला दिला नाही.
मी स्वतः एकदा त्यांच्याकडे निधीसाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट शब्दात तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत, त्यामुळे मी निधी देवू शकत नाही असे सांगतिले होते. मला त्यांचा हा स्पष्टपणा आवडला, त्यांनी आम्हाला का म्हणून निधी द्यायचा. ते आपल्या कार्यकर्त्यांची, पक्षाची किती काळजी घेतात हे वारंवार दिसून आले होते.
आम्हाला निधी मिळत नव्हता त्याला कारणीभूत तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. आपल्या पक्षातील आमदारांना निधी मिळाला पाहिजे, हे पाहण्याची जबाबदारी त्यांची होती. पण ते आम्हाला भेटतच नव्हते तर मग निधीची मागणी कशी करणार? असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.