अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर पार्थ पवार प्रकरणात थेट टीका केली.
त्यांनी पार्थ पवारला ‘कोणाचा मुलगा म्हणून नव्हे तर गुन्हेगार म्हणून’ वागवावे, अशी ठाम मागणी केली.
या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली असून विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला आहे.
Shivsena UBT News : पुण्यातील जमीन प्रकरणात सरकार पूर्णपणे अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपकडून मित्र पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली जातात, अन् सरकारकडूनच त्यांना वाचवलेही जाते, असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला. पार्थ पवार याला कुणाचा मुलगा म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणून ट्रीट केलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलेला मराठवाडा दौरा, त्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पार्थ पवार प्रकरणात घेण्यात आलेली भूमिका या सगळ्या विषयांवर अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. पुणे जमीन प्रकरण अंगलट आल्यानंतर आता व्यवहार रद्द झाला असे सांगितले जाते. व्यवहार रद्द झाला तरीही मुद्रांक शुल्क भरावा लागतो, परंतु महसूल मंत्री यांनी घेतलेली याबाबतची भूमिका अयोग्य आहे.
या प्रकरणात तहसीलदार एक प्यादा आहे. या मागे मोठी साखळी असुन जिल्हाधिकाऱ्यांना देखील अटक झाली पाहिजे आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाल पाहिजे, अशी मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रतिक्रियेचा दाखला देत पार्थ पवार यांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. बावनकुळे यांना उद्देशून 'तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणून सांगतात, आणि महसूलमंत्री तूम्ही म्हणता की 'तपासावे' लागेल!
अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची कागदे थेट बाजारात आणली गेली. आता पार्थ पावरांशी निगडित निर्णय घ्यायची वेळ आली की यांचा 'अभ्यास' सुरू झाला.'काका मला वाचवा', या हाकेला ओ दिला आहे बावनकुळे यांनी! अजित दादांचा राजीनामा घेणे तर दूरच. आता त्यांचे सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही, याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिलेली आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही, हे खरच असा उपरोधिक असा टोला दानवे यांनी लगावला.
शिंदे खोटं बोलले..
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. परभणी आणि जालना येथील आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्ष आणि पक्षप्रमुखांवर टीका केली. यावर दानवे यांनी एकनाथ शिंदे परभणीत सपशेल खोटं बोलले असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. आपण मराठवाड्यात फिरलात'.. असे आपण परभणीत सपशेल खोटे बोललात एकनाथ शिंदे. पूरग्रस्तांना भेटण्यासाठी निघालेल्या आपल्या गाडीची चाके सोलापूरकडून येऊन धाराशिवच्या काही गावांतच रुतली होती.
बहुदा ऍनाकोंडाने पुढे जाण्याची परवानगी दिली नसावी! बिस्किटचे चिंधी पुडे वाटून फोटो काढायचे धंदे तुमच्या धाराशिव जिल्ह्यातील एका आमदाराचे आहेत. लोक त्याला खेकडा म्हणतात! आम्ही केलेली मदत सांगत नसतो. आमची मदत लोक प्रेमाने स्वीकारतात, तुमच्यासारखं गावाचा वेशीपासून हाकलून देत नाहीत, अशा शब्दात शिंदे यांना दानवेंनी टोला लगावला.
जालना येथील शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख हा जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री असा केला. हाच धागा पकडत अंबादास दानवे यांनी जनतेच्या मनातील खोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे अर्जुन खोतकर यांना म्हणायचे आहे का? असा सवाल करत त्यांची कोंडी केली. मनोज पाटील जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाला धनंजय मुंडे यांनी सामोरे जावे, असेही दानवे म्हणाले.
1. अंबादास दानवे यांनी नेमकी कोणती टीका केली?
दानवे यांनी शिंदे आणि बावनकुळे यांच्यावर पार्थ पवार प्रकरणात दुहेरी निकष वापरल्याचा आरोप केला.
2. पार्थ पवारविषयी दानवे यांनी काय वक्तव्य केले?
त्यांनी म्हटले की पार्थ पवारला कोणाचा मुलगा म्हणून नव्हे, तर गुन्हेगार म्हणून वागवले पाहिजे.
3. या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया काय आहे?
भाजप नेत्यांनी दानवे यांचे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून त्यावर प्रतिक्रीया दिली.
4. हे वक्तव्य कुठे केले गेले?
अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.
5. या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम दिसू शकतो?
या विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे गटातला राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.