Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News
Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News Sarkarnma
मराठवाडा

Ambadas Danve Demand enquiry : भुमरेंच्या खात्याकडून करण्यात आलेल्या टॅब खरेदीत घोटाळा, चौकशी करा..

सरकारनामा ब्युरो

Maharashtra News : मनरेगा अंतर्गत शासनाने २६ हजार २५० टॅब खरेदीसाठी काढलेल्या निविदेत घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. (Ambadas Danve Demand enquiry) सदर निविदा प्रक्रिया रद्द करून विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी देखील दानवे यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

संबंधित विभागाचे सचिव नंद कुमार हे परवा निवृत्त होत आहेत, त्यांनी निविदा काढण्याचा सपाटा लावला आहे. (Shivsena) रोजगार हमी योजनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या खात्यात ही निविदा काढण्यात आली आहे. २६ हजार २५० टॅब खरेदीसाठी ७० कोटी रूपयांची खरेदी निविदा काढली गेली आहे. (Marathwada) त्या टॅबमध्ये जीआयएस मोबाईल ऍपप्लिकेशनचा समावेश असावा, अशी अट टाकण्यात आली आहे.

वास्तवित केंद्र सरकारने हे मोबाईल ऍपप्लिकेशन मोफत उपलब्ध करून दिलेले असताना यासाठी ३५ कोटी रूपयांचा खर्च का करण्यात आला? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. (Maharashtra) १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार ५ कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या निविदा काढण्यासाठी उच्चाधिकार समितीची परवानगी घेणे आवश्यक असताना या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही.

सचिवांना १ ते ५ कोटी मर्यादेत निविदा काढण्याचे अधिकार असताना ७० कोटींची निविदा काढण्यात आली त्याचे कारण काय? असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले आहेत. सचिव नंदकुमार निवृत्त होणार असल्याने अवघ्या ११ दिवसांत निविदा काढली गेली असल्याकडे दानवे यांनी लक्ष वेधले.

सॅमसंग कंपनीलाच प्राधान्य देऊन या कंपनीलाच काम देण्यासाठी मंत्र्यांचा आग्रह असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला. रोजगार हमी योजना या खात्यामध्ये अनागोंदी कारभार सुरू असून याची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT