Marathwada : सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज आहे. त्याच प्रमाणे या सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प देखील दगाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे.
आजचा अर्थसंकल्प (Budget) हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असून अर्थसंकल्पात शेतीच्या दृष्टीने विचार केल्यास फलोत्पादन, सहकार सारख्या विभागाला अतिशय तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. (Shivsena) कापूस उत्पादकांना भरघोस मदत करणार अशी घोषणा अर्थसंकल्पात केली, मात्र सरकारने ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न पडतो.
एकीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार असे जाहीर करायचे आणि दुसरीकडे कापूस आयातीचे धोरण राबवायचे हा मोदी सरकारचा दुटप्पीपणाच म्हणावा लागेल. २०१४ पासून मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे. २०१४च्या तुलनेत आता मोठया प्रमाणात वित्तीय तूट केंद्राच्या बजेटमध्ये निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे सर्वांच्याच दृष्टीने हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला.
बेरोजगारीवर सरकार काहीच बोलायला तयार नाही, दोन कोटी नोकऱ्या देणार असे जाहीर करणारे सरकार आता गप्प कसे? हा मोठा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रासाठी हे बजेट अतिशय निराशाजनक आणि अन्याय करणारे ठरले आहे. कर्नाटक राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिथे तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो.
तर दुसरीकडे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार असतांना त्यांनी महाराष्ट्रासाठी अधिकाधिक निधी मिळवून घेतला पाहिजे होता, पण यात त्यांना अपयश आलेले आहे, असा आरोप देखील दानवे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.