opposition Leader Ambadas Danve-Chandrakant Khiare News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : खैरे आमचे नेते, पंकजांच्या नाराजीबद्दल त्यांनाच अधिक माहिती...

Marathwada : पक्षात चढउताराचा काळ येत असतो, आणि मला वाटते भाजपमध्ये पंकजा यांचा काळ निश्चित येईल.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : नुकतीच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची आॅफर दिली होती. पंकजा यांना (Bjp) भाजपमध्ये सातत्याने डावलले जात असल्याचा संदर्भ देत खैरेंनी ही आॅफर दिली होती. पण याच पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र या आॅफरवरून खैरे यांना चिमटा काढला आहे.

खैरे (Chandrakant Khaire) हे आमचे नेते आहेत, पंकजा मुंडे यांच्या नाराजीबद्दल त्यांना जास्त माहिती असले. मला याबद्दल फारशी माहिती नसल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे परस्परविरोधी भूमिका घेण्याचे राजकारण अजूनही या दोन नेत्यांमध्ये सुरू असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाकडून डावलले जात असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे.

विशेषतः परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला तेव्हापासून घडलेल्या घडामोडी पाहता पंकजा समर्थकांची देखील तीच भावना झाली आहे. त्यामुळे पंकजा नाराज असल्याच्या चर्चा असल्या की त्यांना विविध पक्षांकडून आॅफर देखील दिल्या जातात. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नुकतीच अशी आॅफर पंकजा यांना दिली होती.

अर्थात पंकजा यांच्याकडून यावर कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही. इम्तियाज यांच्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून कसा अन्याय होतो हे सांगत त्यांना शिवसेनेत येण्याची आॅफर दिली होती. ही आॅफर देवून ४८ तास उलटत नाही, तोच याच पक्षाचे दुसरे नेते अंबादास दानवे यांनी मात्र खैरेंच्या आॅफरवर चिमटा काढला.

खैरे आमचे मोठे नेते असल्यामुळे पंकजा यांच्या नाराजीबद्दल त्यांना अधिक माहिती असले, मला तशी माहिती नसल्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. पंकजा मुंडे या मासलिडर आहेत, त्यांना पक्षाकडून कशी वागणूक मिळते, त्यांना डावलले जात आहे का? तर मला वाटंत या कारणांमुळे डगमगणाऱ्या त्या नेत्या नाहीत. प्रत्येक पक्षात चढउताराचा काळ येत असतो, आणि मला वाटते भाजपमध्ये पंकजा यांचा काळ निश्चित येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT