Ambadas Danve Letter to jyotiraditya scindia News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve Letter to jyotiraditya scindia : बंद विमानसेवा पुन्हा सुरू करा, दानवेंचे पत्र..

Marathwada : काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाइन्सची सकाळ व संध्याकाळ सेवा सुरु होती.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : छत्रपती संभाजीनगर हे शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी (Tourism Capital) म्हणून ओळखले जाते. युनेस्कोने घोषित केलेले वेरूळ, अजिंठा व लोणार सरोवर हे जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळ देखील याच भागात आहे. या स्थळांना भेटी देण्यासाठी जगभरातून पर्यटक शहरात येत असतात. परंतु त्यांना मुंबईकडे जाण्यासाठी सायंकाळी विमान नाही.

पुर्वी चिकलठाणा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होती, मात्र आता ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांसह शहरातील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Shivsena) केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया (jyotiraditya scindia) यांनी विशेष लक्ष घालून संभाजीनगरसाठी पुर्वी प्रमाणे विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

दानवे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोव्हिड महामारी पूर्वी संभाजीनगरातून देशभरात विविध विमान सेवा कंपन्याद्वारे २४ उड्डाणे होत होती. (Aurangabad) यामध्ये मुंबई, दिल्ली, बेंगळुरू,अहमदाबाद व उदयपूर यांसारख्या शहरांचा समावेश आहे. परंतु साथीच्या रोगानंतर आता दोनच विमान कंपन्या सेवा देत असून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळूरू येथूनच १४ उड्डाणे सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाइन्सची सकाळ व संध्याकाळ सेवा सुरु होती. परंतु कंपनीने हा निर्णय मागे घेऊन सध्या स्थितीत एक वेळेसच विमानसेवा सुरू ठेवली आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत असल्या कारणाने तात्काळ विमान सेवा सुरू करण्यात यावी. दरम्यान, इंडिगो एअरलाइन्सने २५ मार्च रोजी सायंकाळची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

यामुळे संभाजीनगर येथील व्यावसायिक, उद्योजक, प्रवासी व पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महसुलातही घट झाली असून या असुविधमुळे शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील चर्चा सत्र व बैठका रखडल्या असल्याचेही दानवे यांनी ज्योतिरादित्य शिंदिया यांच्या निदर्शनास आणून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT