Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Gas Price: `चुनावी जुमला`, गॅस स्वस्त झाला ; ठाकरे गटाची टीका..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : विरोधी पक्षांकडून देशात लोकसभेच्या मुदतपुर्व निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. (Gas Price News) असे असतांनाच केंद्रातील मोदी सरकराने महागाईच्या प्रश्नावर मार्ग काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विशेष तरतूद करण्यात आल्याची देखील चर्चा आहे. याची प्रचिती देखील येऊ लागली आहे, घरगुती गॅसच्या दरात २०० रुपयांची घट करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या संदर्भात नुकतीच दिल्लीत घोषणा केली. या घोषणेनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. सत्ताधारी (BJP) भाजपकडून रक्षाबंधनानिमित्त देशातील बहिणींना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट असल्याचा दावा केला जात आहे.

तर दुसरीकडे विरोधक मात्र हा चुनावी जुमला असल्याची टीका करतांना दिसत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या निर्णयावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Shivsena) चला गॅस स्वस्त झाला.. निवडणुका आल्या म्हणायचे! परदेश दौरे कमी..देशभर फिरायची हमी!, असा टोला दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारला लगावला आहे.

देशपातळीवर भाजपला महागाईच्या मुद्यावरून घेरण्याची रणनिती `इंडिया`, अंतर्गत एकत्र आलेल्या विरोधकांनी आखली आहे. पण ही रणनिती उधळून लावण्यासाठी भाजपनेही शक्कल लढवायला सुरूवात केली आहे. ११२५ रुपये किंमत असलेला गॅस सिलेंडर दोनशे रुपये कमी करून मोदी सरकारने जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.

महागाई कमी करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जाते. पुढील काही दिवसांत आणखी काही महत्वाचे निर्णय महागाई कमी करण्यासंदर्भात घेतले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील ठाकरे गटाने मात्र केंद्राच्या या निर्णयांना चुनावी जुमला म्हणत, टीका केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT