Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Amit Dshmukh: 'साम, दाम, दंड, भेद वापरून बिनविरोध निवडणुका, भाजपच्या बिनविरोधचं कौतुक नाही'; अमित देशमुखांचा महायुतीवर निशाणा

Amit Deshmukh, Mahayuti, Maharashtra Legislative Council Election: विधान परिषद निवडणुकीतील बिनविरोध विजयांवर अमित देशमुख यांनी महायुतीवर टीका केली. महेश देशमुख यांनी दबाव व प्रलोभनांना न जुमानता निवडणूक लढवल्याचे सांगत त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Jagdish Pansare

MLC Election News : "भाजपाने 17 पैकी 6 जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. पण या बिनविरोधचे फार कौतुक करावे, अशी परिस्थिती नाही. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी साम, दाम, दंड,भेद सगळे तंत्र अंमलात आणले. हे काही लोकशाहीचे चिन्ह नाही", अशा शब्दात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी महायुतीवर टीका केला.

''कोणतेही प्रलोभन किंवा दबावतंत्राला बळी न पडता निर्भयपणे विधानपरिषदेच्या लातूर- धाराशिव- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून, काँग्रेस महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत असलेले महेश देशमुख यांचे कौतुक केलं पाहिजे", असेही देशमुख म्हणाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद निवडणुकी संदर्भात पारदर्शकपणे कायदा आणण्याची मागणी केली, याचे स्वागत असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस- महाविकास आघाडीच्या महेश देशमुख यांना सुजान मतदारांनी विजयी करून लोकशाही व्यवस्था मजबूत करावी असे आवाहन देशमुख यांनी केले. विधान परिषदेच्या लातूर- धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांना विजयी करा, त्यांची ओळख व भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवाअशी विनंती त्यांनी केली.

"महाराष्ट्रात निवडणूकाच होऊ नयेत, अशी राज्यातील सत्ताधाऱ्यांची सध्या भूमिका दिसून येत आहे. निवडणुका झाल्याच तर त्या बिनविरोध व्हाव्यात म्हणून, विरोधी उमेदवारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रलोभन झुगारून देणाऱ्या उमेदवारांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, या माध्यमातून सत्ताधारी पक्षाने विधानपरिषदेचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी महेश देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांचे प्रलोभन आणि दबाव तंत्रही झुगारून दिले आहे, त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे सर्वजण सुजाण आहेत. ते लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव झूगारून, काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करतील", असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

महेश देशमुख हे स्वतः विक्रमी मताधिक्याने जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. मतदार संघातील समस्यांची त्यांना चांगली जाण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या अडीअडचणी ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात. त्यामुळे आपल्या तरुण सहकार्यांला मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद द्यावेत. असेही ते म्हणाले.

लातूर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेस पक्षाने आघाडी केलेली आहे त्यामुळे, लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीतही काँग्रेस महाविकास आघाडीच्या सोबत राहील, असा विश्वास देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT