Maharashtra Assembly Election 2024 : ग्रामीण भागाची जाण असलेल्या, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भुषवलेल्या धीरज देशमुख यांची गॅरंटी मी घेतो. तुम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि आशिर्वाद द्या, असे आवाहन लातूर शहरचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांनी मतदारांना केले. लातूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार बंधू धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अमित देशमुख यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना धीरज देशमुख यांची गॅरंटी घेत असल्याचे सांगितले.
लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसने धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडतानाच धीरज यांना ग्रामीण भागाची जाण आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवलेले आहे. त्यामुळे तुम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि आशिर्वाद द्या. त्यांची गॅरंटी मी घेतो अशा शब्दात अमित देशमुख यांनी मतदारांना साद घातली.
राज्यातील महायुती सरकार हे स्वतःची किंमत लावून आणि फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेवर आलेले आहे. हे सरकार घालवण्याची वेळ आता आली आहे. महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, लातूर जिल्हा आणि राज्यात परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.
दहशत घालून सत्तेवर आलेली ही गद्दारीची कीड मराठवाड्याच्या भूमीतून नष्ट करावी लागेल. त्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या. (Amit Deshmukh) महिलांची सुरक्षितता धोक्यात आलेली असताना आणि त्यांच्यावरील अत्याचाराच्या रोज बातम्या येत असताना बहिणीच्या नावाने सरकारी तिजोरीची उधळपट्टी सुरु आहे.
फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत आलेल्या या महायुती सरकारला पदच्युत करण्यासाठी, महाराष्ट्राला पुन्हा एकदा महाराष्ट्राला त्याचे प्रगत, पुरोगामित्वाचे गतवैभव बहाल करण्याकरिता महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्रात निवडून द्या, असे आवाहन अमित देशमुख प्रचार सभांमधून करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.