Amit Deshmukh election campaign rally 
मराठवाडा

Jalna Assembly Election : भयमुक्त जालन्यासाठी आम्ही कटिबद्ध; अमित देशमुखांचे विधान

Kailas Gorantyal election campaign in Jalna : जालना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांची जाहीर सभा झाली

सरकारनामा ब्युरो

जालना : जालना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेला मोठ्या संख्येने नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

जालना विधानसभा मतदारसंघात आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेल्या कामांना तोड नाही. त्यांनी जालन्याला पाणी पूरवठा योजना आणली. त्यांना साथ देणं काळाची गरज आहे. आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यांना मंत्री करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू! म्हणूनच कैलास गोरंट्याल यांना विजयी करून महाविकास आघाडीचे हात अधिक बळकट करा, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जनतेला केले.

पंचसूत्रीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. जालन्याची एकनिष्ठ जनता या निवडणुकीत दाखवून देणार आहे, असा विश्वास देशमुख यांनी दिला.

यंदा पंजाच आला पाहिजे, जनतेचा विश्वास आणि निष्ठेची ताकद मला भविष्यातील विकासासाठी ऊर्जा देते, असे कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. जालन्याचा सर्वांगीण विकास, प्रत्येक नागरिकांना समान हक्क, भयमुक्त जालन्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.

कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारासाठी जालन्यात यापुर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगढी, तेलंगणा राज्याचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांच्या सभा, बैठका झाल्या. तसेच परतूर येथे जालना जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली होती. यावेळी कैलास गोरंट्याल यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT