Guardian Minister Amit Deshmukh, Latur Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh : मांजरा परिवारात निलंगेकर कारखाना सरस ठरेल ; ऑक्टोबरमध्ये गाळप

कारखाना चालू झाल्याने तालुक्याची आणि शहराची आर्थिक समृद्धी होणार असून या कारखाण्यात विज, इथेनाॅल, बायोगॅस भविष्यात तयार करणार आहोत. (Amit Deshmukh)

राम काळगे

निलंगा : येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आता मांजरा परिवारामध्ये दाखल झाला असून येत्या दिवाळीला कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितले. या निमित्ताने निलंग्याच्या विकासात जडणघडणीचे नवे पान निर्माण करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. (Latur)

निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी ट्वेंटीवन शुगर मिलने घेतला आहे. या कारखान्याच्या मशनरीचे पूजन अमित देशमुख यांच्या हस्ते आज झाले. (Marathwada) यावेळी आमदार धिरज देशमुख, काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, पोलिस आधिक्षक निखिल पिंगळे आदींची उपस्थिती होती.

अंबुलगा सहकारी साखर कारखाना मांजरा परिवारात सामील करून घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे हा काराखाना पूर्ण क्षमतेने चालवून निलंग्यात विकासाची नवी गुढी उभी करत आहोत. या कारखान्याच्या दुरूस्तीसाठी सहा महीने लागणार आहेत. येणाऱ्या दिवाळीला गळीत हंगामाचा शुभारंभ करणार आहोत. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सिंचनाचे जाळे निर्माण केल्यामुळेच येथे ऊसाचे क्षेञ वाढले आहे.

आता तेरणा पट्टा विकसित करायचा आहे. मांजरा तेरणा संगम याच परिसरात होतो, भविष्यात ऊस असणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊ असा विश्वासही अमित देशमुख यांनी उपस्थितांना दिला. अंबुलगा कारखाना आपल्या हक्काचा आहे. कारखाना चालू झाल्याने तालुक्याची आणि शहराची आर्थिक समृद्धी होणार असून या कारखाण्यात विज, इथेनाॅल, बायोगॅस भविष्यात तयार करणार आहोत. विमानाला लागणारे इंधन सुध्दा इथे तयार केले जाईल.

भारत साखर निर्यातीत अग्रेसर आहे, निलंगा व लातूरचे संबंध पिढ्यांनपिढ्याचे आहेत. विकासाच नव पान निलंग्याच्या जडनघडणीतून लवकरच लिहले जाईल. आक्टोबर महिण्यात गळीत हंगामाचा शुभारंभ करू अन् मांजरा परिवारातील कारखान्यापेक्षा काकनभर सरस हा कारखाना चालवून दाखवू. साखर कारखानदारीत आम्ही विश्वास निर्माण केला. शेतकरी, ऊस उत्पादकांचे कायम हित पाहिले. म्हणून आज राज्यभरातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी आमच्या भागातले कारखाने चालवायला घ्या, अशी मागणी करत आहेत, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

शिवाजाराव सहकारी साखर कारखाना चालवायला घेऊन अमित देशमुख यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मास्टर स्ट्रोक लगावल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. शिल्लक ऊसाच्या प्रश्नावरून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी देशमुख कुटुंबावर टीकेची झोड उठवली होती. लातूरात आयोजित लावणी महोत्सवावर टीका करतांना लावणी पेक्षा ऊसाचे बघा, असा टोला निलंगेकरांनी अमित देशमुखांना लगावला होता. परंतु या टीकेला अमित देशमुख यांनी प्रत्यक्ष कृतीतूनच उत्तर दिल्याचे दिसून आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT