Chhatrpati Sambhaji Nagar News : दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांनी यावेळी आंदोलकांवर लाठीमार केला. यावेळी पोलिसांनी मुलींचे कपडे फाडून फटके मारले. प्रायव्हेट पार्टवर लाठ्याही मारल्या. पोलिसांनी गुंडाला अटक करायला हवी होती मात्र केली नाही, असा आरोप सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केला.
छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी दिपके म्हणाले, 'आंदोलनाच्या ठिकाणी ट्रक भरून दगड कोणी आणून ठेवले होते, त्याचा खुलासा व्हायला हवा. आता पोलीस नातेवाईकांना पुढे करत आहेत. सीजेपीचे आंदोलन हिंसक नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलकांनी जंतरमंतरवर शांततापूर्वक आंदोलन केले. तरुण-तरुणींनी कोणीही दगड हातात घेतलेला नाही. भाजपने आंदोलनात गुंड पाठवले होते. पोलिसांसोबत वाईट घडलं. जंतरमंतरवर दगडांनी भरलेला ट्रक होता. तो ट्रक कसा आला? त्याबाबत मी पोलिसांना विचारलं. तर त्यांनी दिल्ली महापालिकेचा ट्रक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दगडांनी भरलेला ट्रक का होता? सर्व भाजपच्या प्लानिंगनुसार झाले आहे. भाजपच्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आम्ही हिसेंच समर्थन करत नाही. आमचं आंदोलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारं आंदोलन होते, असेही दिपके म्हणाले.
‘जंतरमंतरवर ज्यांनी दगडफेक केली, त्यांच्यावर कारवाई करू शकता. परंतु त्यांचा आधार घेऊन किंवा नाव घेऊन विद्यार्थ्यांना त्रास देताहेत, त्याचं काय? मुंबईच्या मुलांनी दिल्लीच्या विद्यार्थ्यांवर दगडफेक केली का? बिहारच्या मुलांनी दिल्ली पोलिसांवर दगडफेक केली का? पश्चिम बंगालच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांवर दगडफेक केली का? त्यांचं नाव घेऊन विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे, असेही दिपके म्हणाले.
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्या आहेत. बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर एके-47 चालवली आहे. पोलीस विद्यार्थ्यांवर एके-47 चालवण्यासाठी भरती झाले का? ज्या लोकांनी दगडफेक केली, त्यांना अटक करा. भाजपच्या गुंडानी 15 दिवसाआधी निशू नावाच्या मुलीच्या वडिलांचं डोके फोडले. याच पोलिसांनी भाजपच्या गुडांना अटक केली नाही. तेव्हा आम्ही कसं अटक करू, असे प्रत्युत्तर पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर धमकी दिल्या जात होत्या. सर्व गोष्टी पोलिसांसमोर झाल्या होत्या, असे दीपकेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.