Marathwada Politics News : मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून अटक आणि जामिनावर सुटका झालेले त्यांचे जुने सहकारी अमोल खुने यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना खुले आव्हान दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्यावर हत्येचा कट रचत सुपारी दिल्याचा आरोप केला होता. माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करावे, नसता त्यांना रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट करावा, अशी खळबळजनक मागणी अमोल खुणे यांनी केली आहे.
रायगडावरील थेट 'टकमक' टोकाच्या जवळ जात त्यांनी या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मी दोषी ठरलो तर माझा या टकमक टोकावरून कडेलोट करा, असे आव्हानही खुणे यांनी दिले आहे. त्यांच्या या आव्हानानंतर मनोज जरांगे पाटील विरुद्ध अमोल खुणे यांच्यातील वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
अमोल खुणे यांनी जरांगेंची SIT चौकशी व नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. आपल्यावर खोटे आरोप लावून अडकवल्याचा दावा करत जरांगे यांचे कारनामे बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी वारंवार दिला होता.
आता अमोल खुणे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देत दंड थोपटले आहे. आपण मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी घेतली असेल तर आपला टकमक टोकावरून कडेलोट करावा, मात्र आपण यात निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास मनोज जरांगे याच टकमक टोकावरून कडेलोट करावा, असे जाहीर आव्हान अमोल खुणे यांनी दिले आहे.
मला शिक्षा व्हावी, यासाठी माझ्या विरोधात ज्या आमदार-खासदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते त्या आमदार, खासदारांनी जरांगेच्या विरोधात नार्को टेस्ट आणि आयआयटीची मागणी करावी, असेही खुणे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे यांच्यावर केलेले आरोप त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. जरांगे यांच्यावर पलटवार करताना खुणे यांनी त्यांच्या आरोपात तथ्य नसते. त्यांनी आरोप करतांना तोंड सांभाळून बोललं पाहिजे. माझ्यावर सुपारी घेऊन बोलतो असे म्हणत माझ्या कुळाचा उद्धार जरांगे यांनी केला होता. माझ त्यांना सांगण आहे, मला तुमचं काढायला लावू नका, मी तोंड उघडले तर तुम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
मी सत्याच्या बाजून बोलतो आहे, पण तुम्हाला जातीयवाद भडकावून दोन समाजात भांडल लावायची आहेत. तुम्हाला समाजासाठी काम करायचे असेल तर करा, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे धंदे बंद करा. विनाकारण मराठ्यांच्या तरुणांची माथे भडकावू नका, असे आवाहनही अमोल खुणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्टसह एसआयटी चौकशी करावी असी मागणी, जरांगेंच्या घातपाताचा आरोप असलेल्या अमोल खुणे यांनी केली होती. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाण करण्यासाठी आपल्याला मनोज जरांगे यांनीच सांगितलं होतं, यात जरांगे मात्र स्वतः पळून गेले होते असा दावा खुणे यांनी यापुर्वी केला होता.
मनोज जरांगे पाटील यांना मारण्याची सुपारी घेतल्याचा आरोप अमोल खुणेवर होता, त्यानंतर त्यांना आणि इतरांना जालना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर खुणे यांनी आरोप केला की, त्यांना दारू पाजून आणि दबावाखाली खोट्या कटात अडकवण्यात आले. खुणे यांनी जरांगेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकीही दिली होती. तर जरांगे यांनी दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, असे म्हणत, जर आरोप सिद्ध झाले नाहीत, तर अमोल खुणेवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.