Jalna News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू असताना मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीसांनी त्याचवेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत. त्यांनी घरी जेवायला यावं असं म्हटलं होतं.त्यावर, भाऊबीजेला बहिणीला साडी-चोळी घेऊन जाईल अशी बोलकी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी त्यावेळी दिली होती. त्यामुळे सगळ्यांनाच भाऊबीजेदिवशी खरंच जरांगे पाटील अमृता फडणवीसांकडे जाणार का, असं बोललं जात होतं. मात्र,त्यावर,आता जरांगे पाटलांनी मोठं विधान केलं आहे.
मनोज जरांगे पाटलांनी भाऊबीजेच्या दिवशी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपणभाऊबीजेचा फराळ अमृता फडणवीसांना पाठवणार असल्याचंही सांगितलं. तसेच त्यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही भाऊबीजेचा फराळ पाठवणार असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे.
जरांगे पाटील म्हणाले, भाऊबीजेला बोलवायची आवश्यकता नसते. आपण बहीण अमृता फडणवीस यांना भाऊबीजेला फराळ पाठवणार आहोत. आमच्या परीने जे शक्य आहे, ते आम्ही तिघींकडे देखील पाठवून देणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं. “आता ठीक आहे. नाही नाही आता बोलावलेलं नाहीये. पण ठीक आहे.
आता बहिणीकडे पाठवून देऊ, तिन्ही बहिणींकडे पाठवून देऊ. आता ताईंकडे पण पाठवून देऊ. अमृता ताईंकडे पण पाठवून देऊ, सुप्रिया ताईंकडे पण आपली भाऊबीज पाठवून देऊ. आमच्या ऐपतीप्रमाणं जे आहे ते पाठवून देऊ,असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
ज्यावेळेस बोलवलं होतं. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, मी मैदानात होतो. मैदानात असल्यावर मागे फिरायचं नसतं, आणि त्याचवेळेस बहिणीने हाक मारली होती की, भावाने जेवायला यावं. बहिणीने साद घातली होती जेवायला या आणि समोर लढताना दाजी होते, त्यामुळे मी गेलो असतो तर दाजी साहजिकच जिंकले असते, म्हणून आपण आंदोलनावेळी अमृता फडणवीसांकडे जेवायला गेलो नव्हतो असं स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणादरम्यान अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना आपला भाऊ मानत घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. नंतर जरांगे यांच्या इशाऱ्यांवर प्रतिक्रिया देताना, "सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे काही करेल ते शांततेतच करेल," असे त्या म्हणाल्या होत्या. भाऊबीजेला जरांगे घरी येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.