Anandraj Ambedkar, Latest News Sarkarnama
मराठवाडा

Anandraj Ambedkar News : छत्रपती संभाजीनगरमधून आनंदराज आंबेडकर उतरणार रिंगणात ? कार्यकर्त्यांचा आग्रह..

Political News : राज्यभरात लवकरच ईव्हीएम मशिन हटाव, देश बचाव, मोहीम राबवणार

Jagdish Pansare

Chhatrpati Sambhajinagar : आगामी लोकसभा निवडणुकाजवळ आल्याने सर्वच पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून लढावे, असा आपल्याला कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आबंडेकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. शिवाय देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. ईव्हिएम ( इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन) वर होणारी प्रक्रिया रद्द करुन मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या, यासाठी राज्यभरात लवकरच ईव्हीएम मशिन हटाव, देश बचाव, मोहीम राबवणार आहोत, असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी ते शहरात आले होते. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज्य आणि देशातील राजकीय घडामोडीवर आपली भूमिका मांडली. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे. आपण दिलेले मत योग्य ठिकाणी जात आहे किंवा नाही याविषयी आज मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. लोकशाहीचा गळा घोटणे थांबले पाहिजे यासाठी, ईव्हीएम मशीन हटावण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

जर्मनीमध्ये ईव्हीएम मशीन विषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानंतर तिथल्या सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची दखल घेण्यात आली होती आणि तिथे ईव्हीएम मशीनवर मतदान प्रक्रिया राबवण्यास बंदी आणली असल्याचा हवाला आनंदराज आंबेडकर यांनी दिला.

आपल्या देशातही सर्वोच्च न्यायालय तशी काही पावले उचलू शकते का? आज सरकारी यंत्रणा इव्हेंटप्रमाणे वापरली जात आहे. संविधान सर्व जातींनी समान न्याय देते मात्र आज सरकारी यंत्रणेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्यांनी त्यांनी आपले धार्मिक कार्यक्रम करावेत, मात्र स्वत:च्या हिंमतीवर करावेत. आपल्या देशातील सर्वोच्य न्यायव्यवस्था प्रभावीपणे निर्णय घेते आहे, ते याची दखल निश्चितच घेतील, असा विश्वासही आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी यावेळी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज भगवान रामांच्या नावावर राजकारण केले जाते. मात्र ज्यांच्या नावावर राजकारण केले जाते ते भगवान राम आज छोटे अन राजकारणी मोठे झाले आहेत, हे दुर्दैव आहे. रामांना छोटे करुन स्वत:ला मोठे दाखवले जात आहे. भगवान राम त्यांना जमिनीवर येण्याची सुबुद्धी देवो, असा टोलाही आनंदराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर नव्हे तर संविधान प्रेमी पक्ष संघटनांच्या सोबतीने संविधान बदलवू इच्छिणाऱ्यांच्या विरुद्ध निवडणूक लढणार आहोत.

संविधान मानणाऱ्या सर्व पक्ष संघटनांसोबत

संविधान प्रेमींची मतं फुटणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी लोक मला आग्रह करत आहेत. मात्र पक्षाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाईल. संविधान मानणाऱ्या सर्व पक्ष संघटनांसोबत आम्ही आहोत. त्यांची धोरण विचारात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरू, असेही आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT