Anjali damania  sarkarnama
मराठवाडा

Anjali Damania : वाल्मिक कराडच्या मुलाच्या कमरेला बंदूक, अंजली दमानियांनी दाखवले फोटो

Anjali damania Valmik karad Son dhananjay munde : महागड्या गाडीला एक मुलगा टेकून उभा राहिला आहे. त्याच्या कमरेला बंदुक लटकवली असल्याचे दिसते आहे. हा मुलगा वाल्मिक कराड यांचा पुत्र असल्याचे अंजली दमानीया यांनी म्हटले आहे.

Roshan More

Anjali Damania News: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले आहेत. बीडमध्ये बंदुकीच्या जोरादवर दहशत निर्माण केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटवरून त्यांनी बंदूक असणाऱ्यांचे फोटो शेअर केले आहेत. दमानिया यांनी आज (शुक्रवारी) वाल्मिक कराड यांच्या मुलाचे फोटो आपल्या ट्विटवरून शेअर केले आहेत.

या ट्विटमध्ये महागड्या गाडीला एक मुलगा टेकून उभा राहिला आहे. त्याच्या कमरेला बंदुक लटकवली असल्याचे दिसते आहे. हा मुलगा वाल्मिक कराड यांचा पुत्र असल्याचे अंजली दमानीया यांनी म्हटले आहे. ट्विटमध्ये सुशील वाल्मिक कराड असे नाव टाकत याच्या नावावर कुठलाही परवाना नसल्याचे म्हटले आहे.या ट्विटवर कमेंटकरताना हा हा वाल्मिक कराड यांचा मुलगा आहे. याचे नाव 'श्री' आहे असे देखील दमानिया यांनी म्हटले आहे.

गाडी आणि गाडीची किंमत

दमानिया यांनी गाडीचे कराड यांचा मुलगा ज्या गाडीला टेकून उभा राहिला आहे. त्या गाडीचे फोटो टाकले आहेत. तसेच ती गाडी वाल्मिक कराड यांच्या नावावर असल्याचे देखील सांगितले आहे. लैंड रोवर डिफेंडर ही ती गाडी असून त्या गाडीची किंमती ऑनरोड 1.23 ते 3.37 कोटी असल्याचा स्क्रिन शाॅट देखील दमानिया यांनी टाकले आहेत. तसेच ही वाल्मिक कराड यांची गाडी आणि ही या गाडीची किंमत. कष्टाचे पैसे असतील बहुतेक असे देखील आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पिस्तूलंच पिस्तुलं...

दमानिया यांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांच्यासोबत डिगोळआबा गावचा सरपंचांचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी त्यांनी लिहिले आहेत पिस्तूलंच पिस्तुलं गोळआबा गावचा सरपंच याचे नाव जयप्रकाश सोनवणे उर्फ बाळासाहेब सोनवणे असे आहे. मला कळवण्यात आले आहे की यांच्यावर खंडणी अपहरण असे अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. SP नवनीत कावत यांनी गुन्हे अहेत की नाही याची खात्री करावी आणि गुन्हा नोंदवावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT