Mp Imtiaz Jaleel News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel On Co-Operative Bank: आणखी एक बॅंक बुडाली, आता तरी ग्राहकांच्या पैशाची हमी द्या..

सरकारनामा ब्युरो

Chh. Sambhajinagar News: आदर्श नागरी पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांच्या दोनशे कोटीहून अधिकच्या ठेवी बुडाल्या. त्या मिळवण्यासाठी ठेवीदार संघर्ष करत असतांना शहरातील आणखी एका सहकारी बॅंकेवर आरबीआयने निर्बंध आणले. (Scam News) अजिंठा अर्बन सहकारी बॅंकेवर निर्बंध लादल्याने आता येथील ग्राहकांना देखील आपलेच पैसे मिळवण्यासाठी झटावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पुन्हा एकदा आरबीआय, सहकार खाते, राज्य सरकार आणि लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. (Aurangabad) आता तरी राज्य सरकारने नागरी सहकारी बॅंकेतील ग्राहकांच्या पैशाची हमी द्यावी, अशी मागणी करणारे ट्विट इम्तियाज यांनी केले आहे.

महाराष्ट्रात आणखी एक सहकारी बँक बुडाली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कायद्यानुसार निराश ग्राहकांना फक्त ५ लाख रुपये मिळतील. (Marathwada) आरबीआयचे पूर्ण नियंत्रण नसणे, लेखा परीक्षक आणि सीएंच्या चुकीच्या पद्धती आणि संचालक मंडळाकडून पैशाचा निव्वळ दुरुपयोग यामुळे सहकारी बँका आणि सोसायट्यांमध्ये हे गैरप्रकार सुरूच आहेत.

काही कठोर कायदे असायला हवेत आणि ग्राहकांच्या प्रत्येक पैशाच्या परताव्याची हमी सरकारने दिली पाहिजे. पण तसे होणार नाही कारण यातील बहुतांश बँका आणि सोसायट्या राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली व्यक्ती चालवतात जे राजकीय पक्षांना वित्तपुरवठा करतात, असा संताप इम्तियाज यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT