Bazar Samiti: APMC Election: Bazar Samiti Election: Krushi Utpanna Bazar Samiti: Market Committee Election: Agricultural Produce Market Committees Elections: Sarkarnama
मराठवाडा

APMC Election : कळंब बाजार समिती; महाविकास आघाडी अन् भाजप-शिवसेना दुरंगी लढत!

Market Committee Election : कळंबमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदे गटाचा चार जगांवर बोळवण..

Chetan Zadpe

Krushi Utpanna Bazar Samiti : धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २०) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १३३ उमेदवारांनी अर्ज परत घेतले. तर आता ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक बी.एस शिंदे यांनी दिली.

दरम्यान, भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ चार जागा देवून कळंब (Kalamb) मध्ये भाजपच वरचढ असल्याचे दाखवून दिले असून, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पॅनेलमध्ये थेट दुरंगी लढत होणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी १६९ अर्ज आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३३ जणांनी माघार घेतली. १८ जागेसाठी ३६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप-शिवसेना युतीच्या पॅनेलला टक्कर देणार आहे.

तत्कालीन सभापतींचा पत्ता कट :

भाजप व शिवसेने बाजार समितीच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपचे तत्कालीन सभापती रामहरी शिंदे यांना उमेदवारी नाकारली आहे. बाजार समितीच्या मालकीचे खुले भूखंड वाटून श्रीखंड खाल्ले त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात लोकांना काय उत्तरे द्यावीत या भीतीपोटी भाजपने या निवडणुकीत तत्कालीन सभापती शिंदे यांचा पत्ता कट केल्याची चर्चा असून निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट होत आहे. तर महाविकास आघाडीने तोडीस तोड उमेदवार देवून बाजार समितीवर वर्चस्व राखण्यासाठी कंबर बांधली आहे.

(BY- Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT