Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

BJP Leader Raosaheb Danve : जनतेने मला नाकारले, आता पक्षाकडे काही मागणार नाही..

Are you the face of the post of Chief Minister? : भाजपमध्ये एखाद्या पदाबद्दल जाहीरपणे इच्छा व्यक्त करणे किती महागात पडते हे रावसाहेब दानवे ओळखून आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुमचे नाव समोर आले तर काय ? या पत्रकारांच्या गुगलीवर दानवे यांनीच षटकार ठोकला.

Jagdish Pansare

नवनाथ इधाटे

BJP Political News : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या जालना लोकसभा मतदारसंघात माझा पराभव झाला. माझ्या या पराभवाबद्दल अनेक चर्चा केल्या जातात. मला याने पाडले, त्याने काम केले नाही. पण मला माहित आहे, मला जनतेने नाकारले आहे. त्यामुळे आता पक्षाकडे काहीही मागणार नाही, पक्ष देईल ती जबाबदारी आनंदाने पार पाडेल.

उद्या सरपंच पदाची निवडणूक लढवायला सांगितली तरी मी लढवेन, अशा शब्दात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्री पदा संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. राज्याचे मुख्यमंत्री पद रिकामे नाही, त्यामुळे मी त्या पदाचा चेहरा म्हणून समोर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत दानवे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.

भाजपमध्ये एखाद्या पदाबद्दल जाहीरपणे इच्छा व्यक्त करणे किती महागात पडते हे रावसाहेब दानवे चांगले ओळखून आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुमचे नाव समोर आले तर काय भूमिका असेल? या पत्रकारांच्या गुगलीवर दानवे यांनीच षटकार ठोकल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

फुलंब्री येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. (BJP) यावेळी त्यांनी अनेक प्रश्नानां उत्तरे दिली. मुख्यमंत्रीपद खाली नाही, पक्षाने सरपंचाची निवडणूक लढा म्हणलं तरी लढेल, असे सांगत दानवे यांनी पक्ष आदेश आपल्यासाठी अंतिम असेल असे स्पष्ट केले.

मराठा चेहरा म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री पदी पक्ष जबाबदारी देऊ शकते का..? तुम्ही पक्षाकडे काही मागणी केली का..? यावर दानवे यांनी चांगलीच फिरकी घेतली. मी पक्षाकडे काहीही मागणी केलेली नाही. पक्षाने संघटनेचे दिलेले काम मी सध्या करीत आहे. मुख्यमंत्री पद खाली नाहीच त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय आमच्या पक्षात मुख्यमंत्री पदासाठी दिग्गज नेते आहेत, मी कोणत्याही मतदार संघातून विधानसभा, विधान परिषद निवडणूक लढणार नाही, हे याआधीच स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी. ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली, की महायुती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगत मराठा आरक्षणाचा चेंडू महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे टोलवला.

विरोधकांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीवर आपली भूमिका स्पष्टपणे मीडियासमोर येऊन सांगावे, असे आव्हानच रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिले. मुख्यमंमहायुतीचे या विधानसभा निवडणुकीत 180 उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT