Arjkun Khotkar & Manoj Jarange Meeting  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Aarakshan Andolan : मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर उपोषणकर्ते जरांगे पाटील यांच्या भेटीला, सरकार मोठा निर्णय घेणार ?

Arjkun Khotkar & Manoj Jarange Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन शिवसेना नेते अर्जुन खोतकर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल....

Deepak Kulkarni

Jalna : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवलं आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलन छेडलं आहे. शुक्रवारी या आंदोलनस्थळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. तसेच एकीकडे विरोधकांकडून लाठीचार्जच्या मुद्द्यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे.

सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत आंदोलकांची रविवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले आहेत. जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी खोतकरांकडून चर्चा सुरु आहे. या बैठकीत उपोषणावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचा निरोप घेऊन शिवसेना नेते अर्जुन खोतकर सोमवारी दुपारी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी खोतकर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरही यावेळी सोबत आहेत. यावेळी त्यांनी चर्चेसाठी दार खुलं करा अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांना केलं.

मराठा आऱक्षणासंदर्भातील उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायदेतज्ञांशी चर्चा करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना सांगितले.

यावेळी ते मराठा आरक्षणा(Maratha Reservation) विषयी महत्वाची निर्णय घेणार आहे. पण त्याआधी अर्जुन खोतकर यांनी काही कागदपत्रे दाखवत मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्रे दिली जातील, असं लिखित आश्वासन दिलं. यावेळी संबंधित कागदपत्रांमध्ये मनोज जरांगे यांनी दुरुस्ती सांगितली. त्यानुसार अर्जुन खोतकर यांनी दुरुस्ती देखील केली. पण यावेळी देखील जरांगे आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

जानकरांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर(Manoj Jarange) यांनी देखील मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. पण जरांगे यांनी उपोषण सोडणार नाही, असं सांगितलं. महादेव जानकर यांनी आंदोलकांना मी तुमच्यासोबत आहोत, असं आश्वासन दिलं. पण स्वत:चा जीव धोक्यात टाकू नका. मराठा समाजाने सारथी संस्था सुरु केली, तेव्हा त्याचा डायरेक्टर मी होतो. आपल्या बांधवांच्या हितासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं महादेव जानकर म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT