Arjun Khotkar Latest News, Shivsena News
Arjun Khotkar Latest News, Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

शिंदेंना नमस्कार करताच बंडखोरीची चर्चा.... वैतागलेले खोतकर म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Arjun Khotkar : दिल्लीत (Delhi) महाराष्ट्र सदनात माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची समोरासमोर भेट झाल्याने आमच्या दोघांमध्ये नमस्कार सुद्धा झाला. नमस्कार करणं ही महाराष्ट्राची संस्कृती मग मी नमस्कार सुद्धा करायचा नाही का?, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिली आहे.

त्यांच्या या भेटीनंतर सोशल मीडियात (Social-media) त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या अफवांवर त्यांनी वैतागून आपलं स्पष्टीकरणं दिलं असून मी आयुष्यभर शिवसेनेतच (Shivsena) राहणार,असे म्हटले आहे. त्यांनी आज (ता.22 जुलै) माध्यमांशी संवाद साधला.

खोतकर म्हणाले, दिल्लीत मी माझ्या वैयक्तिक कामासाठी 4 दिवस होतो. आणि दिल्लीत असताना महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री शिंदे आणि माझी समोरासमोर भेट झाली. आमच्या दोघांमध्ये नमस्कार देखील झाला. मात्र नमस्कार करणं ही महाराष्ट्राची संस्कृती म्हणून मी त्यांना नमस्कार केला. मग मी नमस्कार सुद्धा करायचा नाही का?, असा सवाल खोतकर यांनी उपस्थित केला आहे.

खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीमुळे सोशल मीडियात खोतकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे खोतकरांना याबाबत आपली प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देतांना त्यांनी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो आणि यापुढेही राहणार असून आयुष्यभर शिवसेनेतच राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतून शिंदे गटात जाणारांची जणू रिघ लागली आहे. शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर 12 खासदारांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. यामुळे कोण एकनिष्ठ आणि बंडखोर कोण हे ओळखता येणे शिवसैनिकांना कठीण झाल्याने खोतकरांची शिंदे यांच्यासोबत झालेली अचानक भेटीवर देखील सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत आणि त्यांच्यावर शंका उपस्थित केली जात आहे. आज अखेर खोतकरांना यावर माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरणं द्याव लागल आहे. बंडखोरी झाल्यानंतर नुकतीच खोतकरांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT