Shivsena News, Chhatrapati Sambhajinagar
Shivsena News, Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : बाळासाहेबांनी संभाजीनगरची घोषणा करताच `औरंगाबाद`ला काळे फासणाऱ्या महिला शिवसैनिकांचा सत्कार..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ९ मे १९८८ रोजी झालेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत केले. ही घोषणा केल्याबरोबर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट रेल्वेस्थानक, बसस्थानकावर धडक देत फलकावर लिहलेल्या औरंगाबाद अक्षरांना काळे फासले होते.

आता या दोन्ही शहरांच्या नामांतरावर केंद्राकडून अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून त्या सर्व शिवसेनेच्या (Shivsena) वाघिणींचा सत्कार करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त गुलमंडी येथे महिला आघाडीच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. (Marathwada) नामांतराच्या मुद्यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारसह ठाकरे गटाने या नामांतराचे समर्थन करत ठिकठिकाणी जल्लोष केला. तर या नामांतराला तीव्र विरोध दर्शवत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. अशावेळी ठाकरे गटाने जुन्या आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांच्या एका आदेशानंतर रेल्वेस्टेशन, बसस्थानकावरील औरंगाबाद नावाच्या फलकाला काळे फासले होते.

वैजयंती खैरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सहभागी असणाऱ्या ११ महिला शिवसैनिकांचा आज महिलादिनी गौरव करण्यात आला. वैजयंती खैरे, संपर्कसंघटक सुनीता आउलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, उपजिल्हासंघटक सुनंदा खरात, मालती भोसले, चंद्रकला मोहिते, चंद्रकला चव्हाण, अनुसया शिंदे, माधुरी जोशी, हेमलता पाटील, माया कुलकर्णी, भारती माहरे आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा संघटक मीरा देशपांडे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT