BJP Distirct President News Sarkarnama
मराठवाडा

BJP Distirct President News : मुरकुटे जिल्हाध्यक्ष होताच गुट्टे समर्थक भडकले..

सरकारनामा ब्युरो

Parbhani : गेल्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेडमधून अपक्ष लढलेले आणि आता पुन्हा निवडणुकीस इच्छूक असलेल्या संतोष मुरकुटे यांची भाजपने नुकतीच परभणीचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली. (BJP Distirct President News) एका अर्थाने भाजपने त्यांना आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी हिरवा कंदीलच दिल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू आहे.

मात्र मुरकुटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होवून ४८ तास उलटत नाही तोच रासपचे आमदार रत्नाकर गुटे समर्थकांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली. (Parbhani) गुट्टे समर्थक मित्रमंडळाने पत्रकार परिषद घेत मुरकुटे यांच्यावर नाव न घेता टीका केली. (BJP) भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य असलेली `ती` मंडळी ज्यांच्यासोबत असते त्यांच्यावर कधीच गुलाल उधळला जात नाही. ते जिकडे पराभव तिकडे, अशा शब्दांत मुरकुटे यांना उद्देशून टीका केली.

रासपचे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे यांनी पत्रकार परिषद घेत मुरकुटे यांच्या जिल्हाध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले. (Marathwada) मुरकुटे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाला विरोध केल्याचा आरोप विठ्ठल रबदाडे, व्यंकटराव तांदळे यांनी केला होता. त्याला आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ आणि रासपच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

मुरकुटे यांचा उल्लेख न करता रोकडे म्हणाले, ती मंडळी ज्यांच्यासोबत असते त्यांच्यावर कधीच गुलाल उधळला जात नाही. फक्त खड्ड्यात घालण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. तर गुट्टे मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे म्हणाले, आमदार डॉ. गुट्टे आणि भाजपतील पक्षश्रेष्ठींचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत. गुट्टे हे फक्त मतदारसंघातील विकासाचाच विचार करतात. त्यामुळे भाजपचा जिल्हाध्यक्ष कुणीही झाला तर आम्हाला काही फरक पडत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT