Rahul Gandhi, Aditya Thackeray, Bharat Jodo Yatra Latest News Hingoli
Rahul Gandhi, Aditya Thackeray, Bharat Jodo Yatra Latest News Hingoli Sarkarnama
मराठवाडा

राहुल गांधींनी आदित्य ठाकरेंना मिठी मारताच म्हणाले, बाबा कसे आहेत?

सरकारनामा ब्यूरो

हिंगोली : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी (ता. ११ नोव्हेंबर) सहभाग घेतला.‌ या यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करताच शिवसैनिकांनी राहुल यांच्या यात्रेचे जोरदार स्वागत केले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे रॅलीत सहभागी होणार हे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. यामुळे अनेकांच्या नजरा राहुल आणि आदित्य भेटीकडे लागल्या होत्या. (Rahul Gandhi, Aditya Thackeray, Bharat Jodo Yatra Latest News Hingoli)

आज सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास यात्रा सुरू होण्याआधी आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा ताफा राहुल यांच्या कॅम्पमध्ये येऊन पोहचला. यावेळी आदित्य यांच्या सोबत शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते.

यावेळी आदित्य ठाकरे येताच राहुल गांधींनी उभे राहत आदित्य यांना कडाडून मिठी मारली आणि कधी आलात, अशी विचारणा करत वडील कसे आहेत?,अशी न चुकता विचारणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर लगेच एकाच गाडीने राहुल गांधी सभेकडे निघाले. याच गाडीत राहुल गांधी आणि आदित्य हे मागच्या सीटवर बसलेले दिसले.

हिंगोलीतील यात्रेत राहुल आणि आदित्य ठाकरे दोघेही सहभागी झाले आणि काही मिनटं एकत्र यात्रेत सहभाग घेतला. त्यानंतर आदित्य यांनी यात्रेतून निरोप घेतला. मात्र राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) भेटीची चांगलीच चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT