बीड ः शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, हे साकडे घालण्यासाठी बीड (Beed) ते तिरुपती पायी निघालेल्या सुमंत रुईकर या कट्टर शिवसैनिकांचा (Shivsena) दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पश्चात रुईकर कुटुंबाची अडचण होऊ नये, त्यांना (Marathwada)आधार मिळावा यासाठी शिवसेनेने तातडीने रुईकर कुटुंबाची जबादारी स्वीकारल्याचे जाहीर केले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली होती. ही घोषणा होऊन चोवीस तास उलटत नाही तोच शिवसेनेची मदत रुईकर कुटुंबाच्या घरी पोहचवण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये आज रुईकर कुटुंबियांची भेट घेत त्यांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत दिली.
याशिवाय रुईकर यांच्या पत्नीला नोकरी, मुलांचं उच्चशिक्षण यांचा खर्च शिवसेनेने उचलणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. सुमंत रुईकर हे एकनिष्ठ आणि प्रामाणिक शिवसैनिक होते, त्यांच्या कुटुंबामागे शिवसेना भक्कमपणए उभी असून लवकरच या कुटुंबाला पक्के घर देणार असल्याचेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. डाॅक्टरांच्या सल्याने ते सध्या विश्रांती घेत आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, त्यांना चांगले आरोग्य लाभावे, असे साकडे तिरुपती बालाजीला घालण्यासाठी सुमंत रुईकर आपल्या काही मित्रांसह बीड ते तिरुपती पायी निघाले होते.
दरम्यान, त्यांना ताप आला, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने हाॅस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यापुर्वी देखील रुईकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून, बीड ते तिरुपती अशी पायी वारी केली होती. रुईकरांचा मृत्यू हा शिवसेना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला होता.
शिवसैनिकाच्या कुटंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे स्पष्ट करत शिवसेनेने रुईकर कुटुंबाची संपुर्ण जबादारी स्वीकारल्याचे नुकतेच जाहीर केले होते. नुसते जाहीर करून शिवसेना थांबली नाही, तर तातडीने पाच लाखांची मदत रुईकर कुटुबांकडे पोहचवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.