politician in Temple Sarkarnama
मराठवाडा

मंदिरे खुली होताच, राजकीय नेत्यांचा देवाकडे धावा

(Bjp Leader Radhakrishna Vikhe Patil)राज्यातील कोरोनाची परिस्थिती पुर्णपणे नाहीसी होऊ दे, पूर, अतिवृष्टीचे संकट टळू दे, आणि शेतकऱ्यांना तातडीने (Mahur Temple) मदत करण्याची सुबुद्धी राज्य सरकारला दे

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळे आजपासून खुली करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी राज्यासह मराठवाड्यातील विविध मंदिरांमध्ये सर्वसामान्यांप्रमाणेच राजकीय नेत्यांनी देखील देवाकडे धावा केल्याचे चित्र होते. राज्यातील मदीरालये सुरू पण मंदिरे बंद अशी टीका करत, रस्त्यावर उतरलेल्या भाजप नेत्यांनी देखील मंदिरात जाऊन देवाला साकडे घातले.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन घेऊन साकडे घातले, तर तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सपत्नीक तुळजाभवानीचे दर्शन घेतले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी औरंगाबाद शहरातील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेत आरती केली, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांनी कर्णपुरा देवीपुढे नतमस्तक होत विविध मंदिरात जाऊन आरती केली.

कोरोनाच्या संकटामुळे गेली दीड वर्ष राज्यातील `देऊळबंद` होती. याचा फटका धार्मिक स्थळाच्या आसपास व्यवसाय करणाऱ्या लाखो छोट्या-मोठ्या व्यापारी, दुकानदारांना बसला. परंतु कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेत, विरोधकांची टीका सहन करत ठाम निर्णय घेतला आणि मंदिरे बंदच ठेवली. दरम्यान, टप्याटप्याने बाजारपेठा, उद्योग, माॅल, थिएटर, खाजगी कार्यालये व इतर सुरू करत असतांना घटस्थापनेचा मुहूर्त साधत मुख्यमत्र्यांनी राज्यातील धार्मिकस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला.

यावरून विरोधकांनी हे आमच्या आंदोलनाचे यश आहे असे म्हणत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तर राज्य सरकार आम्ही योग्यवेळी निर्णय घेतल्याचे सांगत आहे. आज राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी या सर्वांनीच देवाचा धावा करत आपले गाऱ्हाणे मांडले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी गजानन महाराज मंदिरात जाऊन आरती केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कर्णपुरा देवी, आयोध्यानगरी येथील मारूती मंदीर, नगरनाका रोडवरील महालक्ष्मी मंदीर, देवगड येथील दत्त मंदिर व रात्री उशीरापर्यंत आपण शहर व जिल्ह्यातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांनी देखील सकाळीच शहारचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णपुरा देवी, सातारा येथील खंडोबा मंदिरात आरती केली.

विखे पोहचले माहूरगडावर..

भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहूरगडावर जाऊन रेणूका मातेच्या चरणी डोक ठेवत आशिर्वाद घेतले. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पुर्णपणे नाहीसी होऊ दे, पूर, अतिवृष्टीचे संकट टळू दे, आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची सुबुद्धी राज्य सरकारला दे असे साकडे देखील रेणुका देवीला घातले. भाजपच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच राज्य सरकारने धार्मिकस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा देखील विखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलातंना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT