MP IMTIAZ JALIL  Sarkarnama
मराठवाडा

AIMIM Imtiyaz Jaleel News : 'आदमी दो और सवाल, छह सौ चालीस..' लोकसभेत आवाज 'एमआयएम'चाच...

MP IMTIAZ JALIL : संसदेत विचारले सर्वाधिक प्रश्न

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : संपुर्ण देशातून एमआयएम पक्षाचे दोन खासदार निवडून संसदेत गेले आहेत. पुर्वी असदुद्दीन ओवैसी हे एकमेव खासदार लोकसभेत किल्ला लढवायचे. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील यांच्या रुपाने दुसरा खासदार दिल्लीत गेला. या पाच वर्षात संसदेत एमआयएमच्या या दोन खासदारांचाच आवाज सर्वाधिक घुमल्याची माहिती आता समोर आली आहे.

कोणत्या पक्षाच्या खासदारांनी सभागृहात किती प्रश्न विचारले या यादीत असदुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील सर्वात वर आहेत. या दोघांनी मिळून तब्बल 640 प्रश्न विचारल्याचे समोर आले आहे. यावरून शोले चित्रपटातील संवाद आठवल्याशिवाय राहत नाही. 'आदमी दो, और सवाल छह सौ चालीस' असेच म्हणावे लागेल. ओवैसी हे आपल्या आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात. विशेषतः मुस्लिम समाजाच्या विकासासंबंधी प्रश्न असेल तर मग त्यांचा आवाज सभागृहात चांगलाच घुमतो.

बॅरिस्टर असल्यामुळे मुद्देसूद, कायद्याचा आधार आणि सरकारने मुस्लिमांच्या विरोधात केलेल्या कायद्यांची चिरफाड करतांना ओवैसी चांगलेच आक्रमक होतात. आधी ते एकटे सभागृहात बाजू मांडायचे, पण आता त्यांच्या सोबतीला महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज जलील हेही गेल्या पाच वर्षापासून केंद्रात आहेत.

केंद्र सरकारच्या योजना, अर्थसंकल्प, शिक्षण, बेरोजगारी, देशाची सुरक्षा, ट्रिपल तलाक, कलम-370, राम मंदीर, ज्ञानव्यापी, सीएए अशा सर्व विषयांवर या दोघांनी गेल्या पाच वर्षात सत्ताधारी पक्षांवर यथेच्छ टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभागृहात आणि बाहेरही ही जोडी कायम आक्रमकपणे लढा देत राहिली. भाजपची बी टीम अशी टीका सहन करत ओवैसी आणि इम्तियाज यांनी आपली भूमिका, परखड मते सभागृहात मांडली.

याचा लेखाजोखा समोर आला तेव्हा सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीत ओवैसी- जलील यांनी वरचे स्थान मिळवले. 'हम दो है इसलिये हलके मे मत लेना, है तयार हम..' असे म्हणत इम्तियाज जलील यांनी आगामी लोकसभेच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांना इशारा दिला होता.

आता सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीत अग्रस्थानी असल्यानंतर इम्तियाज यांनी विरोधकांना आरसा दाखवत त्यांच्यावरही निशाणा साधला आहे. हे वाचून मला एकाच वेळी आनंद आणि दु:ख होत आहे. 'ये तो हाल है विरोधी पार्टी का. केवळ 2 खासदार असलेल्या पक्षाने संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत.

जिथे जवळपास 220 खासदार विरोधी पक्षात बसले आहेत. कल्पना करा की आपल्यापैकी आणखी लोक सत्तेवर आले तर', असा सवाल करत भाजप की भी शुरूआत 2 से ही हुई थी, असा सूचक इशारा द्यायलाही इम्तियाज विसरले नाही. त्यांच्या या सोशल मीडियावरील या पोस्टची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT