Ashok Chavan News, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : महापुरूषांच्या नावाने वाद निर्माण करुन विकास कामांवर वरवंटा फिरवला जातोय..

Nanded : वर्चस्व सत्ता यातून दमदाटी करत हुकूमशाहीकडे जाणारी वाटचाल पत्करू नये. याउलट लोकांना विश्वासात घ्यावे लागते.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : सत्तेच्या नावाखाली वर्चस्व निर्माण करण्यासाठी दमदाटी करून चालत नाही. याउलट लोकांना विश्वासात घ्यावे लागते. तेच खरे राजकारण सर्वमान्य असते ,मात्र राज्यामध्ये विशेषतः देशात महापुरुषांच्या नावाने वादंग निर्माण करून विकास कामावर वरवंटा फिरवला जात आहे. जनतेला वेठीस धरल्याने राज्य आणि देश हुकूमशाहीकडे जात असल्याची टीका माजी मंत्री आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली.

लोहा आणि कंधार तालुक्यातील दिवंगत भाई केशवराव धोंडगे, सुभाष सावकार सूर्यवंशी, मुक्ताबाई पाटील पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी अशोक चव्हाण आले होते. (Nanded) चव्हाण म्हणाले, सांत्वन करण्यासाठी दोन-तीन परिवारांना या भागात भेट दिली. व्यक्तिगत भेटीसाठी आलो, मात्र शरद पाटील पवार हे लोहा तालुक्यातील राजकीय संघर्षातील कार्यकर्ते आहेत. (Marathwada) पत्नीचे निधन झाले तरी ते डगमगले नाहीत.

राजकारणात अनेकदा चढउतार पाहिले, मात्र नांदेड जिल्ह्याचे राजकारण विचित्र वाटते. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर विनाकारण संघर्ष करू नये. लोहा शहरातील शिवाजी चौकात नियोजित पुतळ्यासाठी जागेचे प्रकरण करावे म्हणून ७५ लाख रुपये मंजूर केले. पण या कामावर सत्ताधारी भाजपा सरकारने वरवंटा फिरवला. जनतेला गृहित धरण्याचे काम काही लोक करतात असा टोला चव्हाण यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना नाव न घेता लगावला.

वर्चस्व सत्ता यातून दमदाटी करत हुकूमशाहीकडे जाणारी वाटचाल पत्करू नये. याउलट लोकांना विश्वासात घ्यावे लागते. देशात विशेषता राज्यात महापुरुषांच्या नावाने वाद निर्माण केला जातो हे राज्य संत आणि महापुरुषांचा सन्मान करणारे आहे. मात्र या भागाचे दुर्दैव आहे. चांगल्या कामाला खोडा घालायचा पायंडा पाडला जात आहे.

मराठवाडा आणि महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण, केशवराव धोंडगे यांचे विचार वेगवेगळे असले तरी एकमेकावर चुकीचे दोषारोप त्यांनी कधी केले नाहीत. लोकहिताची कामे करताना एकमेकांना विश्वासात घेऊन राजकारण केले, आता असे नेते होणे नाही असेही चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT