devendra fadnavis manoj jarange patil ashok chavan sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News: जरांगेच्या घोषणेनंतर काही वेळातच भाजप खासदार चव्हाणांचा दावा आला समोर; म्हणाले 'सरकारने मराठा समाजाला...'

Maratha Reservation News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या जीआरच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी पुन्हा 30 मे पासून उपोषणाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीतून त्यांनी पुढील लढ्याची घोषणा करताना सरकारला इशारा दिला आहे.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने शब्द दिलेला आहे. त्या संदर्भात जीआर काढलेला आहे, त्यामुळे आता यात फार अडचणी राहिलेल्या नाहीत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील निश्चितच या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलतील. ज्या गोष्टी राहिल्या आहेत, त्याचीही अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या जीआरच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी पुन्हा 30 मे पासून उपोषणाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीतून त्यांनी पुढील लढ्याची घोषणा करताना सरकारला इशारा दिला आहे.

58 लाख नोंदी सापडल्या त्याचे सर्व प्रमाणपत्र द्या, सातारा संस्थानचा GR काढून त्याची अंमलबजावणी करा, सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानाचा GR काढून त्याची अंमलबजावणी करा, यासह अन्य मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.

या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वाचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे या विषयात आता फार अडचणी राहिलेल्या नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. ते निश्चितच मनोज जरांगे पाटील यांचाशी चर्चा करतील आणि राहिलेले प्रश्नही मार्गी लागतील.

महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात समाजाला कमिटमेंट दिलेली आहे, निश्चितच ती शंभर टक्के पूर्ण केली जाईल, यात शंका असण्याचे कारण नाही. विखे पाटील आणि राज्य सरकार जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढतील. सरकारने मराठा समाजाला शब्द दिला आहे, त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल, याचा पुनरुच्चार अशोक चव्हाण यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT