Ashok Chavan-Khatgaonkar Sarkarnama
मराठवाडा

दाजींच्या घरवापसीने अशोक चव्हाण खूष; म्हणाले, काॅंग्रेसला बळकटी मिळेल

( Nanded Congress, Ashok Chavan Happy)खतगावकर व त्यांच्या समर्थकांचा काॅंग्रेसमधील प्रवेश महाविका आघाडीसाठी महत्वाचा ठरणार आहे.

सरकानामा ब्युरो

औरंगाबाद ः माजी मंत्री भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर पाटील खतगांवकर यांनी पक्षाला रामराम करत पुन्हा काॅंग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केली. खतगांवकरांच्या या निर्णयाने अशोक चव्हाण भलतेच खूष झाले आहेत. खतगांवकर हे चव्हाण यांचे भावजी आहेत. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात खतगांवकर-चव्हाण यांच्यात वीळ्याभोपळ्याचे वैर असल्याचे अनेकदा दिसून आले. २०१४ मध्ये खतगांवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तो देखील अशोक चव्हाण यांच्याशी असलेल्या राजकीय वैरातूनच असे देखील बोलले जाते.

सात वर्ष भाजपमध्ये राहिलेले प्रदेश उपाध्यक्ष खतगांवकर यांनी अखेर भाजपला रामराम करत काॅंग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन नुकतीच त्यांनी ही घोषणा केली. त्यांनतर काही मिनिटातच अशोक चव्हाण यांनी ट्विट करत खतगांवकर व त्यांच्यासोबत काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

खतगांवकर, पोकर्णा व इतर पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाचे मी स्वागत करतो, तमुच्या पक्ष प्रवेशाने मराठवाड्यात संघटनेला बळकटी मिळेल, अशी सदिच्छा देखील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असतांनाच खतगावकर व त्यांच्या समर्थकांचा काॅंग्रेसमधील प्रवेश महाविका आघाडीसाठी महत्वाचा ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी देखील या सगळ्यांचे पक्षात स्वागत असल्याचे ट्विट करत आनंद व्यक्त केला. अशोक चव्हाण म्हणतात, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे मी स्वागत करतो. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नांदेड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडयातील पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, याचा मला विश्वास आहे.

माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह काँग्रेस प्रवेशाची घोषणा करणारे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचेही मी पक्षात स्वागत करतो. त्यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास देखील चव्हाण यांनी ट्विटमधून व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT