Keshavrao Dhondge-Ashok Chavan News, Mumbai 
मराठवाडा

Ashok Chavan : लग्नासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, अन् वरदक्षिणा म्हणून महाविद्यालयाला मदत..

शंककराव चव्हाण आणि केशवराव यांच्यात वैचारिक मतभेद होते, पण तरीदेखील या दोघांमधील वैयक्तिक संबंध चांगले होते. (Ashok Chavan)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केशवरावर धोंडगे हे मुहूर्त वगैर मानत नसतं. जेव्हा त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी मुहूर्त वगैरे काही नाही, १५ आॅगस्ट म्हणजे देश स्वतंत्र झाला तो दिवस कुठल्या मुहूर्तापेक्षा कमी आहे का? म्हणत त्याच दिवशी आपला विवाह केला. (Nanded) वरदक्षिणा प्रथा देखील त्यांना मान्य नव्हती, द्यायचेच असेल तर शिवाजी महाविद्यालयात शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी काहीतरी करा, असे आवाहन केशवराव धोंडगे यांनी केले होते, अशी आठवण माजी मंत्री आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सभागृहात सांगितली.

माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या संसदीय व विधी मंडळातील कार्याचा गौरव आज विधानसभेत करण्यात आला. (Marathwada) यावरील प्रस्तावावर बोलतांना अशोक चव्हाण यांनी केशवराव धोंडगे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

अशोक चव्हाण म्हणाले, ९२ ते ९५ मध्ये मी राज्यमंत्री असतांना केशवरावांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. तेव्हा विरोधी पक्षाची बाजू ते जोरकरसपणे सभागृहात मांडायचे. केशवराव बोलायला उभे राहिल्यानंतर सगळे मंत्री, अधिकारी सभागृहात तयारीने यायचे. राज्याची बाजू मांडत असतांना प्रामुख्याने ते मराठवाड्याची बाजू भक्कमपणे मांडायचे. मंत्रीमंडळाची बैठक आणि अधिवेशन मराठवाड्यात झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी ते नेहमी करायचे.

टोकदार, घणाघाती तर कधी हळवे अशी त्यांची भाषणे नव्या सदस्यांना आणि पिढीला निश्चितच मार्गदर्शन करणारी ठरतील. केशवरावांचा स्वभाव निर्भीड होता, एखादी गोष्ट नाही पटली तर ते तोंडावर सांगून मोकळे व्हायचे. अगदी पंतप्रधानांसमोर देखील ते निर्भीडपणे वागल्याचे दिसून आले होते. गोर-गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटी स्थापन केली.

जेव्हा केशवरावांचे लग्न झाले तेव्हा त्यांनी १५ आॅगस्टचा मुहूर्त काढला. वरदक्षिणा न घेता महाविद्यालयाला मदत करा, अशी भूमिका घेतली जेणे करून गोर-गरीबांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळेल. त्यांचे जयक्रांती हे स्वःताचे वृत्तपत्र होते, ते आजही चालवतात. शंककराव चव्हाण आणि केशवराव यांच्यात वैचारिक मतभेद होते, पण तरीदेखील या दोघांमधील वैयक्तिक संबंध चांगले होते.

गुराखी गडाची स्थापना करत त्यांनी समजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जीवन संघर्षमय होते, शेकापचं काम ते आजही प्रामाणिकपणे करतात. कापूस एकाधिकार योजना झाली पाहिजे यासाठी केशवरावांनी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. केशवराव हे पहिले असे व्यक्ती असतील ज्यांची जन्मशताब्दी आपण सभागृहात साजरी करत आहोत. त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच माझी या निमित्ताने त्यांना सदिच्छा असल्याचेही चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT