पक्षांतरानंतर नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण पुन्हा एकदा आपली राजकीय पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेसकडून त्यांना रोखण्यासाठी गुप्त रणनीती आणि स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.
भाजपमध्ये गेल्यानंतर चव्हाणांच्या नेतृत्वाखालील नांदेडमधील समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
Local Body Election : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा बिगुल जानेवारीमध्ये वाजणार आहे. अनेक वर्षापासून महापालिकेवर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची एकहाती सत्ता होती. आता ते भाजपसोबत असल्याने पक्षांतरानंतरही त्यांची जादू नांदेडमध्ये दिसणार का? हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. तर काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण त्यांना कसे रोखतात? याकडेही राज्याचे लक्ष असणार आहे.
आज जाहीर झालेल्या महापालिका आरक्षण सोडतीनूसार जिल्हा परिषद पाठोपाठ महापालिकेतही महिलाराज येणार असून, 81 पैकी तब्बल 41 म्हणजेच पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे मनपाची चावीही महिलांच्या हाती असणार आहे. यापूर्वी माजी नगरसेवक असलेल्या अनेक प्रस्थापित पुढाऱ्यांना प्रभागाचे आरक्षण बदलामुळे धक्का बसला असून, त्यांच्यावर दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.
या सोडतीनंतर काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता, तर काहीजण हिरमुसले होते. महापालिका क्षेत्रातील एकूण 20 प्रभागांपैकी 81 सदस्य पदासाठी जाहीर केलेल्या जागांपैकी सर्वसाधारण जागांवर 43 सदस्य निवडून येतील. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसीसाठी) 21 जागा, अनुसूचित जातीसाठी 15, तर अनूसिच जमातीसाठी दोन जागा आरक्षित झाल्या आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष जोरदार तयारीनीशी मैदानात उतरणार आहेत.
निवडणुकीसाठी एका प्रभागातून अनेक इच्छूक असल्याने बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. महापालिकेवर 1 ते 19 प्रभागांतून प्रत्येकी चार सदस्य, तर 20 क्रमांकाच्या प्रभागातून पाच सदस्य निवडून द्यायचे आहेत. नांदेड-वाघाळा शहर महापालिकेवर मागील निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा प्रभाव असल्याने महापालिका अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात होती.
काँग्रेस 73, भाजप 6, शिवसेना 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होते. यापूर्वी महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. तेव्हा 73 जागा निवडून आल्या होत्या. पण, आता खासदार अशोक चव्हाण भाजपत असल्याने काँग्रेस पक्षाला मागील निवडणुकीत जिंकलेल्या 73 जागा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान खासदार रवींद्र चव्हाण तसेच काँग्रेस पक्षापुढे असणार आहे. तर दुसरीकडे 6 नगरसेवकांच्या संख्येवरून बहुमतांचा आकडा गाठून महापालिकेवर भाजपचे कमळ फुलविण्याचे भाजपपुढे म्हणजेच खासदर अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.
मागील निवडणुकीत महापालिकेत शिवसेनेचा एकच नगरसेवक निवडून आला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. पण, या निवडणुकीत शिवसेनेला संख्याबळ वाढविण्यासाठी, तर राष्ट्रवादीलाही शहरात आपली ताकद दाखविण्याची मोठी संधी असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. शहरातील काही प्रभागांत आजही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षाचा प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित आणि एमआयएम काय जादू करणार? हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आरक्षणाचा तपशील
एकूण सदस्य संख्या- 81
अनुसूचित जाती- 15
अनुसूचित जमाती- 2
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-21
सर्वसाधारण- 43
एकूण महिला जागा- 41
महिलांचे आरक्षण
4 सदस्यीय प्रभागा- 2महिला
5 सदस्यीय प्रभागात - 3 महिला
1. प्रश्न: अशोक चव्हाण कोणत्या पक्षात आहेत सध्या?
उत्तर: त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
2. प्रश्न: नांदेड महापालिकेत काँग्रेसची सध्याची स्थिती काय आहे?
उत्तर: काँग्रेस अजूनही नांदेडमध्ये मजबूत आहे, पण चव्हाणांच्या पक्षांतरानंतर आव्हान वाढले आहे.
3. प्रश्न: काँग्रेसचा प्लान काय आहे अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी?
उत्तर: स्थानिक नेत्यांना पुढे करून व गठबंधनाचे राजकारण साधण्याची शक्यता आहे.
4. प्रश्न: नांदेडमधील मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे?
उत्तर: मतदारांमध्ये चव्हाणांविषयी अजूनही आदर आहे, पण काँग्रेसची गटबाजी त्यांना तोटा पोहोचवू शकते.
5. प्रश्न: या निवडणुकीचा मराठवाडा राजकारणावर काय परिणाम होईल?
उत्तर: नांदेडमधील निकाल मराठवाड्यातील पुढील राजकीय समीकरणांना दिशा देईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.