Minister Tanaji Sawant-Ashok Chavan News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : संवेदनशील विषयावर गांभीर्यपूर्वकच बोलले पाहिजे ; सावतांना सल्ला..

आक्रमक भाषण ठोकण्याच्या उत्साहात त्यांनी आम्ही सत्तेवर येताच मराठा समाजाला आरक्षणाची खाज कशी सुटली असे आक्षेपाहार्य विधान केले. (Health Minister Tanaji Sawant

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणा संदर्भात वादग्रस्त विधान केले आणि राज्यातील मराठा समाज संतप्त झाला. उस्मानाबाद येथील हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रे दरम्यान बोलतांना सावंत (Tanaji Sawant) यांची जीभ घसरली. त्यामुळे त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राहिलेले माजी मंत्री आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. संवेदनशील विषयांवर गांभीर्यपूर्वकच बोलले पाहिजे. मुळात (Maratha Reservation) मराठा आरक्षण ही एखादी राजकीय मागणी नसून, सकल मराठा समाजाची वस्तुनिष्ठ मागणी आहे. त्याकडे राजकीय चष्म्यातून बघणे योग्य नाही, असा सल्ला त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

राज्यातील सत्तातंरानंतर आरोग्य मंत्री झालेले प्रा. तानाजी सावत आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. २०१४ मधील युती सरकारमध्ये खेकड्यांनी धरण फोडल्याच्या त्यांच्या विधानामुळे त्यांची राज्यभरात शोभा झाली होती.

तर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोग्य खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर शासकीय रुग्णालये आणि आरोग्य विभागाला औषध पुरवठा करणाऱ्या हाफकीन या कंपनी संदर्भात एक व्यक्ती समजून केलेले विधान देखील त्यांच्या चांगलेच अंगलट आले होते. त्याची सावरासावर करता करता त्यांची दमछाक झाली होती.

पण वादग्रस्त विधान करण्याची त्यांची मालिका काही संपत नाहीये. हिंदू गर्व गर्जना यात्रेत आक्रमक भाषण ठोकण्याच्या उत्साहात त्यांनी आम्ही सत्तेवर येताच मराठा समाजाला आरक्षणाची खाज कशी सुटली असे आक्षेपाहार्य विधान केले.

त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. सावंत यांना माफी देखील मागावी लागली. या सगळ्या प्रकारावर अशोक चव्हाण यांनी संयमित प्रतिक्रिया व्यक्त करत सावंत यांना अशा संवदेनशील विषयावर गांभीर्यपूर्वकच बोलले पाहिजे असा सल्ला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT