Shreejaya Chavan, Ashok chavan  Sarkarnama
मराठवाडा

Bhokar Assembly Constituency : श्रीजया यांना शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा, भोकरच्या विकासाला गती मिळेल!

Shankarao Chavan's political legacy to Srijaya Chavan : असे उमेदवार हवे आहेत जे तालुक्यातील विकासकामे खेचून आणू शकतील, असे मत व्यक्त केले. अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांना डॉ. शंकरराव चव्हाण यांचा सक्षम राजकीय वारसा आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : भोकर मतदारसंघासह या भागाच्या विकासाला देशाचे माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विकासाचा वारसा आहे. सिंचनाच्या माध्यमातून हा परिसर सुजलाम् सुफलाम् करण्यात आला आहे. नांदेड, भोकरच्या विकासाला गती देण्याचे काम केले. ऊस व केळी या पिकातून शेतकरी आर्थिक संपन्न झाला आहे. यापुढेही या भागातील विकासाची गती कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवार ॲड. श्रीजया चव्हाण यांना विजयी करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या ॲड. श्रीजया चव्हाण पहिल्यांदा निवडणुक लढवत आहेत. त्यांच्याकडून भोकरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. (Ashok Chavan) नांदेडच्या विकासाला गती देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू, असा शब्द अशोक चव्हाण यांनी कन्या श्रीजया यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत दिला. विरोधक जातीजातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, मतदारांनी सावधपणे भूमिका समजून घ्यावी, असे आवाहन भाजपचे किशोर देशमुख यांनी केले.

अर्धापूर, मुदखेड, भोकर या तालुक्यातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी (ता.6) विशेष सभा घेण्यात आली. यावेळी अशोक चव्हाण, महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे, नरेंद्र चव्हाण, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बालाजी जाधव, डॉ. विश्वांभर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. विकासाच्या अजेंड्यावर भर देत मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

अशोक चव्हाण यांनी विकासाची जाण असलेल्या उमेदवाराची निवड करण्याचे महत्त्व स्पष्ट करताना असे उमेदवार हवे आहेत जे तालुक्यातील विकासकामे खेचून आणू शकतील, असे मत व्यक्त केले. (Nanded) त्यांनी उर्वरित विकासकामे पूर्ण करण्याच्या आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांना डॉ. शंकरराव चव्हाण यांचा सक्षम राजकीय वारसा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कामामुळे नांदेडची एक विशिष्ट ओळख निर्माण झाली आहे. निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विरोधकांकडून होणारा व्यक्तीगत विरोध दुर्लक्षित करावा आणि मतदानाचा टक्का वाढवून विकासाला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT