Ashok Chavan Meet jyotiraditya scindia News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : नांदेडहून मुंबई , दिल्ली, नागपूर, कोल्हापूरसाठी विमान सुरू करा..

Marathwada : ज्योतिरादित्य शिंदे यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेत त्याकडे स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

सरकारनामा ब्युरो

Chavan Meet jyotiraditya scindia : नांदेड व कोल्हापूर ही दोन्ही शहरे देशातील प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. Nanded नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा आणि कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत असतात. त्यामुळे या दोन्ही शहरांची विमानसेवा सुरळीत असणे आवश्यक आहे.

त्यामुळे नांदेड-मुंबई व मुंबई-कोल्हापूर ही विमानसेवा ट्रुजेटऐवजी इंडिगो किंवा एअर इंडियासारख्या कंपनीकडे सोपवण्याची मागणी काॅंग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांची दिल्लीत भेट घेऊन केली. (Marathwada) त्याचप्रमाणे नांदेडवरून मुंबईसह, हैद्राबाद, नवी दिल्ली, अमृतसर, चंदिगड, पुणे, शिर्डी, नागपूर व कोल्हापूरसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणीही केली.

नांदेड येथील विमानसेवेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेत त्याकडे स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.शिंदे यांनी नांदेड शहराला अनेकदा भेटी दिल्या असून, या चर्चेत त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

देशाच्या नकाशावर नांदेड शहराचे स्थान महत्वपूर्ण असल्याची मला जाणीव असून, येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन, असा शब्द नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला आहे. आज सायंकाळी नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीत त्यांनी ही सकारात्मक भूमिका घेतल्याचे चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT