Ashok Chavan, Bhaskarrao Patil Khatgaonkar Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan: काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या खतगावकरांना चव्हाणांंचा मोलाचा सल्ला; म्हणाले, 'आमच्यासोबत राहिलात तर...'

Ashok Chavan And Bhaskarrao Khatgaonkar : खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा काँगेस प्रवेश करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

Deepak Kulkarni

Nanded News : काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये दाखल झाले होते. प्रवेश केल्यानंतर 24 तासांच्या आतच चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकीही मिळवली. पण त्यांच्यासोबतच भाजपमध्ये दाखल झालेले त्यांचे मेहुणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी अवघ्या सात महिन्यांतच घरवापसी करत काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपला रामराम ठोकत काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या भास्कर खतगावकरांना खासदार अशोक चव्हाणांचा (Ashok Chavan) मोलाचा सल्ला दिला आहे. मी इतकंच सांगू शकतो की,आमच्याकडे राहिलात तर ते सुरक्षित राहतील असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजप खासदार अशोक चव्हाणांनी मंगळवारी (ता.17) मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी खतगावकर यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशावर मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया देत अधिकचं भाष्य करणं टाळलं आहे.तसेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासह अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

चव्हाण म्हणाले,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुती सरकारची समन्वयातून मार्ग काढण्याची भूमिका आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण करु नये,अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा काँगेस प्रवेश करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. भाजपने आपल्याला आत्तापर्यंत तीनवेळा उमेदवारी डावलली. त्यामुळेच आपण काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसकडून आपली सून मीनल खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचा शब्द देण्यात आल्याची माहिती देत भास्कर खतगावकर यांनी काँग्रेस पक्षप्रवेशाचे संकेत दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT