Ram Shinde Sambhaji Patil nilangekar sarkarnama
मराठवाडा

Ram Shinde : संभाजी पाटील निलंगेकरांचा मतदारसंघ बदलणार? राम शिंदेंचं सूचक वक्तव्य

राम काळगे

Ram Shinde News : विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने निलंगा येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात माजी मंत्री राम शिंदे यांनी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी लातूर मध्य मतदारसंघातून संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या या सूचनेने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

'पक्षाने ठरवलं तर तुम्हाला लातूर शहर विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवावी लागेल. याबाबतही तयारी ठेवा, अशा सूचना माजी मंत्री राम शिंदे यांनी निलंगा येथे संभाजीराव पाटील निलंगेकर यांना केली.

राम शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्यासाठी अनेकवेळा जनतेला पसंती नसलेल्या उमेदवाराची उमेदवारी लादली जाते. मात्र जनतेच्या मनातला उमेदवार असणे गरजेचे आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात कोण उमेदवार आहे. यासाठी या घेतलेल्या या अधिवेशनचा उपक्रम राज्याला दिशा देणारा आहे.

लातूर जिल्ह्यात एकीकडे माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेसचे दिग्गज होते. येथील राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व होते.

अनेक वर्षापासूनचे असलेले वर्चस्व मोडून जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, बाजार समित्या भाजपाकडे खेचून आणल्या आहेत, असे राम शिंदे म्हणाले. निलंगा येथे झालेल्या अधिवेशनाला यावेळी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलींद लातूरे, भगवानराव पाटील यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT