Mla Sanjay Shirsat On Notice News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Notice News : विधानसभा अध्यक्षांची नोटीस ही एक प्रक्रिया, आमच्यावर कारवाई अशक्यच..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : सर्वोच्च न्यायालाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदेंच्या शिवसेनेसंदर्भात दिलेला निकाल आणि त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी `त्या` १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल द्यावयाचा निर्णय याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. (Sanjay Shirsat On Notice News) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना नोटीस बजावल्याच्या वृत्ताला शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला आहे.

अद्याप मला नोटीस मिळाली नसली तरी अध्यक्षांकडून नोटीस येणे हा प्रोसेसचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी जो निकाल दिला आहे, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीवर निर्णय घ्यावा लागणार आहे. (Shivsena) त्यामुळे एक प्रक्रिया म्हणून जशा आम्हाला नोटीस मिळतील, तशा त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांनाही आमच्या मागणीनूसार मिळतील.

पण नोटीस आल्या म्हणजे आम्ही अपात्र ठरलो असा त्याचा अर्थ लावणे चुकीचे आहे. (Marathwada) आम्ही सर्व सोळा आमदार विधानसभा अध्यक्षांसमोर आमची बाजू मांडू. दोन तृतीयांश सदस्यांसह आम्ही पक्षातून बाहेर पडलो होते, त्यामुळे आमच्यावर अपात्रतेची कारवाई होवूच शकत नाही, असा दावा देखील शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. विरोधकांनी मागणी केली असली तरी ती ते कोणत्या कायद्याचे आधारे करत आहेत, हे त्यांना अध्यक्षांसमोर सांगावे लागेल.

त्याच प्रमाणे आमचे म्हणणे देखील विधानसभा अध्यक्ष ऐकून घेतील आणि कायद्यानूसार निर्णय घेतील, असेही शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांनी आमच्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये विष कालवले आहे, त्यामुळे मी बाजूला होतो, ४० आमदार परत येतील का? हे जे पश्चातापाचे बोल ते बोलातायेत ती वेळ आता निघून गेली आहे. गद्दार, ५० खोक्यांचे आमच्यावर आरोप केले गेले, अत्यंत खालच्या पातळीवर जावून टीका केली गेली, आम्ही परत आल्यावर आमच्यावरचे आरोप निघून जातील का? असा सवाल देखील शिरसाट यांनी उपस्थितीत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT