Minister Atul Save News, Aurangabad
Minister Atul Save News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Atul Save : शेतातील शेवटचा ऊस जात नाही तोपर्यंत कारखाने सुरू राहणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : गेल्या गळीत हंगामात शिल्लक ऊसाचा प्रश्न राज्याला भेडसावत होता. कारखाने बंद झाल्यामुळे राज्यात विशेषत: मराठवाड्यातील बीड, जालना जिल्ह्यात अतिरिक्त ऊस शिल्लक राहिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाच्या गळीत हंगामात मात्र असा प्रकार होणार नाही, शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाचे शेवटचे टिपरू कारखान्यात जात नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

सकाळ मराठवाडा आवृत्तीच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाश सावे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नानावर सरकारची भूमिका स्पष्ट केले. (Atul Save) सावे म्हणाले, अतिरिक्त (Sugarcane) ऊसाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, गेल्यावेळी गाळप हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा होता. त्यामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम तर झालाच, पण कारखान्यांना ऊसच न गेल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते.

हे पुन्हा घडू नये म्हणून आम्ही यंदाचा गाळप हंगाम १५ आॅक्टोबरपासूनच सुरू करण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले होते. परंतु काही कारणांमुळे कारखाने सुरू होऊ शकले नव्हते. परंतु येत्या काही दिवसांत कारखाने सुरू होऊन यंदाच्या ऊस गाळपाला सुरूवात होईल.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सहकार खात्याने कारखान्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त गाळपाची परवानगी दिली आहे. तसेच शेतकऱ्याचा सगळा ऊस कारखान्यात जाईपर्यंत ते सुरूच ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सगळा ऊस अगदी शेवटचे टिपरू कारखान्यात जाईपर्यंत कारखाने सुरू राहणार असल्याचेही सावे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या हंगामपेक्षा साखरेचे उत्पादन देखील वाढले, असा विश्वास देखील सावे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT