Minister Atul Save On Andheri By-election news, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Atul Save : आमच्याकडे १६६ आमदार, त्यांच्याकडे एक वाढल्याने काय फरक पडणार ?

एखाद्या आमदाराचे निधन झाले, पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटूंबातील कोणी उमेदवार असेल तर यापुर्वीही माघार घेतली गेली आहे. ( Minister Atul Save)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. (Bjp) भाजप घाबरली, गुप्त सर्वेत पराभव होणार स्पष्ट झाल्याने माघार घेतली यासह अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी देखील यावर भाष्य केले. आमच्याकडे १६६ आमदार आहेत, त्यांच्या एक आमदार वाढला तर काय फरक पडणार आहे? अशा शब्दात त्यांनी भाजपने माघार घेतली अशी टीका करणाऱ्यांना सुनावले.

अंधेरी पुर्व निवडणुकीतून भाजपने पटेल यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. त्यानंतर पटेल यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले. (Shivsena) भाजपसह मनसे विरोधात घोषणाबाजी करत त्यांनी आपला राग व्यक्त केला. इकडे राज्यभरातील भाजप व इतर पक्षाचे नेते देखील यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहकार मंत्री अतुल सावे यांना या संदर्भात छेडले. तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याचा दाखला देत वरिष्ठ नेत्यांचीच री ओढली. आमच्याकडे १६६ आमदार आहेत, मग त्यांच्या एखादा वाढला तरी काय फरक पडतो? असा टोला देखील त्यांनी लगावला.

सावे म्हणाले, एखाद्या आमदाराचे निधन झाले, पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटूंबातील कोणी उमेदवार असेल तर यापुर्वीही माघार घेतली गेली आहे. हा भावनात्मक विषय असल्याने आताही भाजपने तशीच माघार घेतली आहे. आमच्याकडे १६६ आमदार आहेत, त्यांचा एक वढल्याने काही फरक पडणार नसल्याचा पुनरुच्चार देखील सावे यांनी केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी हा पक्षाच्या नेत्यांचा सामुदायीक निर्णय असल्याचे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT