Santosh Bangar News
Santosh Bangar News  Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar News: आमदार बांगरांची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

सरकारनामा ब्युरो

Santosh Bangar News : शिंदे गटाचे नेते संतोष बांगर कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. अशातच आता पुन्हा एकदा आमदार बांगर यांचा शिविगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील एक व्यक्ती फोनवरुन आमदार संतोष बांगर यांना आपली अडचण सांगत असतानाच बांगर यांनी त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

वसमत तालुक्यातील एका व्यक्तीने आमदार बांगर यांना फोन केला. संतोष बांगर यांना त्यांना कोण आणि कुठून बोलता असा प्रश्न विचारल्यावर समोरुन मी वसमत तालुक्यातील चिखली गावातून बोलत असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले. तसेच, मला फायनान्स कंपन्यां त्रास देत असल्याचे सांगितले. याचवेळी त्या व्यक्तीने आमदार बांगर यांच्याकडे मदत मागितली. त्यावर संतोष बांगर यांचे निधन झाल्याचे स्वत:च आमदार बांगर यांनी त्या व्यक्तीला सांगितलं. आमदार बांगरांच्या उत्तरामुळे संतप्त झालेली त्या व्यक्तीने शिवीगाळ करताच बांगर यांनी त्या व्यक्तीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

या दोघांचे संभाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मध्यान्ह भोजन योजनेतील एका कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर काही दिवसांपूर्वी एका प्राचार्याला मारहाण केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. अशा कारणांमुळे सोशल मीडियात ते अनेकदा ट्रोल होतात.

काही दिवसांपूर्वी बांगर यांनी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यास मारहाण केली होती. याप्रकरणी प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी बांगरांसह ३० ते ४० जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित ऑडिओ क्लिपची 'सरकारनामा' पुष्टी करत नाही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT