Abdul Sattar-Mp Supriya Sule News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंबद्दल काढले अपशब्द..

तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्हालाही देवू, असे म्हणतांना वादग्रस्त भाषा वापरली. सिल्लोड येथे आज सायंकाळी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. (Abdul Sattar)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. सिल्लोड या आपल्या मतदारसंघात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषा वापरली. त्यानंतर एकच खळबळ उडाली असून सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस आक्रमक होतांना दिसत आहे.

राज्यातील सत्तातंरानंतर शिंदे सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर सातत्याने ५० खोके घेतल्याचा आरोप होत आहे. (Supriya sule) यावरून विरोधक शिंदे व त्यांच्या समर्थकांवर तुटून पडले आहेत. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपुर्वी असाच आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर केल्याचे बोलले जाते.

त्यावर सत्तार यांनी तुम्हाला काही खोके पाहिजे का? असा पलटवार केला होता. त्याला प्रत्युत्तर देतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, की तुम्हाला मिळाले असतील म्हणूनच तुम्ही आॅफर करतायं. या संदर्भात सिल्लोडमध्ये एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सत्तार यांना विचारले असता, सत्तारांनी पातळी सोडत सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख केला.

तसेच तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्हालाही देवू, असे म्हणतांना वादग्रस्त भाषा वापरली. सिल्लोड येथे आज सायंकाळी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी पाहण्यासाठी ते नगर परिषदेसमोरील मैदानावर आले होते. यावेळी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सत्तार यांना सुप्रिया सुळे यांचा संदर्भ देत प्रश्न विचारले. यावर सत्तारांनी पातळी सोडून टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT