Marathwada : महिलेची छेड काढत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे (Vishal Dhume) यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. गृहविभागाने या संदर्भातील आदेश काढले असल्याची माहिती आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या संदर्भात ट्विट करत कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
एसीपी विशाल ढुमे यांनी एका महिलेची छेड काढत तिचा विनयभंग केल्यामुळे (Aurangabad) औरंगाबादेत संतापाची लाट पसरली होती. (Crime News) सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच सामाजिक संघटनांनी ढुमे यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर या संदर्भात वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली झाल्या आणि ढुमे यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब झाले.
कालच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे पिडित महिलेच्या घरी जावून भेटून आले होते. कायद्याचे रक्षकच महिलांच्या अंगावर हात टाकत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे? असा संतप्त सवाल त्यांनी केला होता. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी ढुमे यांच्या गुन्ह्याचा तपास करून त्याचा सविस्तर अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठवला असल्याचे सांगत आहेत. ढुमे एसीपी रॅंकचे अधिकारी असल्याने कारवाईची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवरच होईल, असे सांगितले होते.
तर इम्तियाज जलील यांनी काल डीजीपी रजनीश सेठ यांच्याशी बोलून या अधिकाऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. पोलीस दलाचे नाव बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित न केल्यास शुक्रवारी सर्व राजकीय/सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन बंद पाळतील आणि क्रांतीचौक ते मिल कॉर्नरवरील सीपी कार्यालयापर्यंत मोर्चा काढतील, अशी माहिती त्यांनी डीजींना दिली होती. तत्पुर्वीच ढुमे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.