औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर हे आपल्या कडकशिस्त आणि वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. (Divisional Commissioner) आतापर्यंत त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर कुणाच्याही दबावाला बळी न पडता सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. (Aurangabad) त्यामुळे प्रशासनात त्यांचा चांगलाच दरारा आहे. (Marathwada) आपल्या डॅशिंग स्वभाव आणि कारभारामुळे त्यांनी जिथे जिथे काम केले, तिथे आपली छाप तर सोडलीच पण चाहतेही निर्माण केले.
अशा या डॅशिंग अधिकाऱ्याच्या बाबतीत एक थरारक घटना नुकतीच घडली. विभागीय आयुक्तांसाठीच्या गुलशन महल या शासकीय बंगल्यात शनिवारी रात्री एक विषारी घोणस (साप) आढळून आला. हा बंगला जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अतंरावरच आहे. पण इथे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा, झाडं झुडंप असल्याने अनेकदा साप, विंचू असे प्राणी आढळून आलेले आहेत. तर रात्री जेवण झाल्यानंतर केंद्रकर हे बंगल्याच्या आवारात फिरत असतांना त्यांचा कुत्रा जोराने भुंकत होता. याकडे केंद्रकरांचे लक्ष गेले आणि ते त्या दिशेने गेले.
पाहिले तर एक भला मोठा साप ( घोणस) त्या फुत्कार सोडतांना दिसून आला. हा विषारी साप असावा याचा अंदाज आल्याने क्षणाचाही विलंब न लावता केंद्रेकरांनी घरातील शिपाई व इतर कर्मचाऱ्यांना आवज देत घोणस पकडण्यासाठी चिमटा आणण्यास सांगितले. स्टीलचा राॅड असलेल्या चिमट्याने या सापाला पकण्याचा प्रयत्न केंद्रेकरांनी केला. पण तो वारंवार निसटून बंगल्याच्या दिशेने जात होता. जेव्हा जेव्हा केंद्रेकरांनी त्याला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने केंद्रकरांवर हल्ला करण्यासाठी फुत्कार सोडले.
पाच ते सहा फूट लांब या घोणसाचा प्रयत्न दोनवेळा फसल्यामुळेच केंद्रकर सुखरूप राहिले. साप घरात शिरण्याच्या प्रयत्नात असल्याने केंद्रेकरांनी त्याला चिमट्याने एकाच ठिकाणी दाबून ठेवले. तोपर्यंत सर्प मित्राशी संपर्क साधण्यात आला होता. मग काहीवेळातच सर्पमित्राने या घोणसला पकडून नेले. दरम्यान, काही तास चाललेल्या या थरारामुळे सगळ्यांचीच धांदल उडाली होती. केंद्रकर यांनी घोणसला थोपवून ठेवण्यासाठी जीव धोक्यात घालून धाडंस दाखवले.
घोणसने दोनवेळा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण मोठ्या शिताफीने केंद्रकर यांनी स्वतःचा बचाव केला. सर्पमित्राने घोणस ताब्यात घेतल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, केंद्रेकरांच्या या धाडसाची चर्चा दुसऱ्या दिवशी शहरभरात झाली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना हे समजल्यावर त्यांनी केंद्रकरांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली, तसेच त्यांच्या धाडसाबद्दल अभिनंदनही केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.