Abdul Sattar-Bornare-Sanjay Shirsat-Sandipan Bhumre Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad District Bank Election: जिल्हा बँकेत आठ संचालकांनी उधळला 'बिनविरोध' विजयाचा गुलाल; शिवसेनेचे 5, भाजपा 2 तर काँग्रेसनेही उघडलं खातं

Mahayuti Politics: औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता.23) सकाळपासूनच विरोधकांपेक्षा महायुतीतच मोठ्या राजकीय घडामोडी दिसून आल्या. सकाळपासून दोन ठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांनंतर दुपारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या पाच मिनिटांपर्यंत जिल्हा बँकेतही खलबते सुरू होती.

Jagdish Pansare

Shivsena-BJP-Congress : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडींनंतर महायुतीला 7 जागा बिनविरोध निवडून आणण्यात यश आले. मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या एकत्रित बैठकीनंतर शिंदेसेनेच्या 5, भाजपच्या 2 तर काँग्रेसची 1 अशा एकुण 8 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता एकूण 12 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत.

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता.23) सकाळपासूनच विरोधकांपेक्षा महायुतीतच मोठ्या राजकीय घडामोडी दिसून आल्या. सकाळपासून दोन ठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांनंतर दुपारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या पाच मिनिटांपर्यंत जिल्हा बँकेतही खलबते सुरू होती. उमेदवारी अर्ज माघार घेताना मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारांची मोठी मनधरणी करावी लागली.

अखेर प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स. सेवा सहकारी संस्थांच्या तालुकानिहाय 9 जागांपैकी 5 जागा बिनविरोध निघाल्या. यात खुलताबादेतून भाजपचे संदीप निकम, फुलंब्रीतून काँग्रेसचे अनिल बोरसे, सिल्लोडमधून शिंदेसेनेचे अर्जून गाढे, पैठणमधून आमदार विलास भुमरे, वैजापुरातून आमदार रमेश बोरणारे यांचा समावेश आहे.

कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातून अब्दुल समीर सत्तार, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदारसंघातून पालकमंत्री संजय शिरसाट, तर विशेष मागास प्रवर्ग / विमुक्त जाती मतदारसंघातून वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेश परदेशी हे बिनविरोध निवडून आले आहेत. याची अधिकृत घोषणा उद्या (ता.24) होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी सांगितले.

12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात

21 संचालकपदांसाठी अर्ज छाननीनंतर एकूण 120 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. त्यात 83 उमेदवारांनी माघार घेतली. तर वैयक्तीक मतदार संघातून एकच अर्ज दाखल झालेला होता, तो छाननीतच अवैध ठरला. त्यामुळे आता हे पद रिकामेच राहणार आहे. एकूण 20 संचालकपदांसाठीच ही निवडणूक होत असून पैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरीत 12 जागांसाठी एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांची घोषणा व चिन्हांचे वाटप उद्या केले जाणार आहे.

हे आहेत बिनविरोध संचालक

प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स. सेवा सहकारी संस्था

1. खुलताबाद - संदीप निकम (भाजप)

2. फुलंब्री - अनिल बोरसे ( काँग्रेस)

3. सिल्लोड - अर्जून गाढे (शिंदेसेना)

4. पैठण - आमदार विलास भुमरे ( शिंदेसेना)

5. वैजापूर -आमदार रमेश बोरणारे (शिंदेसेना)

कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया

1.अब्दुल समीर सत्तार ( शिंदेसेना)

अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती

1. पालकमंत्री संजय शिरसाट (शिंदेसेना)

विशेष मागास प्रवर्ग / विमुक्त जाती

1. दिनेश परदेशी (भाजप)

यांनी घेतली माघार

आमदार सुहास शिरसाट, रामराव शेळके, किशोर शितोळे, राजू शिंदे, अभिजित देशमुख, हर्षदा शिरसाट, पुनमचंद बमणे, ज्ञानेश्वर मोठे, निशांत पाटील, अर्जून पाटील, एकनाथ जाधव, राजू भुमरे, रविंद्र संचेती, देवयानी डोणगावकर, श्रद्धा माने, प्रदीप शिंदे, गोकुळसिंग राजपूत, बाबुराव पवार, कविता घुगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT