Metro Project In Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : दिवाळीनंतर मिळणार मेट्रो रेल्वेचा डीपीआर

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी या दोन औद्योगिक वसाहतींना जोडणारा अखंड उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन केले जात आहे. (Aurangabad) नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच दिवाळीनंतर मेट्रो रेल्वेचा डिपीआर मिळण्याची शक्यता आहे. (Metro Rail) सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार औद्योगिकदृष्ट्या विकसीत होणारे शहर म्हणून औरंगाबादची देशात ओळख आहे.

येत्या दहा वर्षात शहरात मेट्रो रेल्वेसाठी वरिष्ठ पातळीवरुन तयारी सुरू असून शहराच्या चारही बाजूंनी होणारी वाढ पाहता मुंबई-दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळे कंपन्यांचे जाळे निर्माण होत आहे. (Marathwada) वाळूज एमआयडीसीतही विविध उद्योग सुरू असून अतिरिक्त औद्योगिक वसाहतही विकसीत होणार आहे.

या दोन्ही औद्योगिक वसाहतींत मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग असेल. त्यामुळे त्यांच्यासह शहरवासीयांना मेट्रोची भविष्यात गरज भासणार आहे. वाढत्या नागरिकरणामुळे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक पाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील मेट्रो रेल्वे सुरू करण्याची तयारी सुरू आहे. वाळूज ते शेंद्रा डीएमआयसी व ऑरिक सिटी अशी मेट्रो सुरू करण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी स्मार्ट सिटीने महामेट्रो रेल्वे महामंडळाची नियुक्ती केली आहे.

महामेट्रोने शहराचे सर्वेक्षण सुरू केले असून सर्व माहिती गोळा केली आहे. शहराच्या विविध भागात होणारा विकास, विविध प्रकल्पांसाठी जागांची उपयोगिता याबद्दलचा गतिशिलता आराखडा तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हा आराखडा स्मार्ट सिटीकडे सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा एमआयडीसीदरम्यान नियोजीत मेट्रो रेल्वेसह अखंड उड्डाणपुल तयार करण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. डीपीआरसाठी सर्वेक्षण करुन त्याचे प्राथमिक सादरीकरण केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या सूचनांचा विचारात घेऊन एकसंघ डबलडेकर उड्डाणपुल तयार करण्यासाठी डीपीआर तयार केला जात आहे. हा डीपीआर नोव्हेंबरमध्ये राज्य शासनासह स्मार्ट सिटी आणि महापालिकेकडे सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT