Ajit Pawar, Ncp
Ajit Pawar, Ncp Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : शिवसेनेच्या माजी जि.प. सभापतीचा राष्ट्रवादीत प्रवेश..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा लगबग सुरू होताच पक्ष प्रवेश सोहळ्यांना देखील वेग आला आहे. (Ncp) मुंबईतील राष्ट्रवादी भवनात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील व औरंगाबाद जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे (Shivsena) माजी सभापती मारूती साळवे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.

म्हस्के पाटील यांनी मागील अनेक वर्षे पत्रकारिता करताना परखड मतं मांडण्याचे काम केले आहे, असे (Ajit Pawar) अजित पवार म्हणाले. या मान्यवरांचे नगर व औरंगाबाद (Aurangabad) या दोन्ही ठिकाणी पक्ष संघटना बळकट होण्यासाठी नक्कीच सहकार्य मिळेल. पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम होईल.

तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी हा पक्ष प्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करून अजितद पवारांनी दोन्ही मान्यवरांचे तसेच त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.

मारूती साळवे हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्यरत होते. दलित आघाडीचे पदाधिकारी असलेले साळवे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा धक्का समजला जातो.

राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाला आपले संघटन वाढवण्याचा अधिकार असल्याचे सूत्र महाविकास आघाडीने स्वीकारले आहे. साळवे यांच्या प्रवेशाकडे त्याच दृष्टीने बघितले जाते.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT