Ncp Ex. City Chief join Shivsena In Mumbai, News
Ncp Ex. City Chief join Shivsena In Mumbai, News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राज्यात संघटन वाढीसाठी फिरत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे माजी शहराध्यक्षाने (Shivsena) शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Marathwada) यांच्या उपस्थितीत गटप्रमुखांचा मेळावा झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या तडाखेबंद भाषणाचे राजकीय पडसाद देखील उमटत आहेत.

अशावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील (Ncp) राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजयराव साळवे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या शिवाय जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले.

वाल्मिकी समाजाचे जिल्हाध्यक्ष विक्की चावरीया, संघर्ष सोनावणे, वैजापूर तालुक्यातील जानेफळचे सरपंच जितेंद्र जगदाळे, पंढरपूरचे उपसरपंच महेंद्र खोतकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

विजयराव साळवे हे पुर्वी भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रेवश केला. अजित पवार यांच्याशी जवळीक असतांना त्यांना काही महिन्यापुर्वी शहराध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले होते. या नाराजीतूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जाते.

या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार उदयसिंग राजपूत उपस्थित होते. राज्यात उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष पेटला आहे.

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील मेळाव्याला महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर हा वाद टोकाला गेला आहे. दसरा मेळाव्याच्या मुद्यावरून या दोन्ही सेना एकमेकांना भिडण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेणार, असे ठणकावून सांगितले आहे. अशातच राष्ट्रवादी व इतर पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत दाखल होत असल्याने याची चर्चा होऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT