Minister Dr. Karad Meeting For Air connectivity News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad News: विमानसेवा विस्तारासाठी मंत्री कराडांचे प्रयत्न ; दिल्लीत बैठक..

Dr. Bhagwat Karad : केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत या हवाई सेवा देण्यासंदर्भात कराड यांनी विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

सरकारनामा ब्युरो

Marathwada News: मराठवाड्याची व राज्याची पर्यटन राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद (Aurangabad) शहरातून देशाच्या विविध भागात एअर कनेक्टीव्हीटी वाढावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी पुढाकर घेतला असून या संदर्भात नुकतीच दिल्लीत बैठक घेवून आढावा घेतला.

दिल्लीमध्ये इंडिगो, स्पाइस जेट ,गो फर्स्ट विमान सेवा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. (Dr.Bhagwat Karad) या बैठकीमध्ये औरंगाबाद शहरातून देशातील इतर शहरात विमानसेवा पुरविण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. (Marathwada) बैठकीसाठी इंडिगो एअरलाइन्सचे प्रवीण गुप्ता, इंडिगोचे मोहित कुमार द्विवेदी आदी उपस्थित होते.

औरंगाबाद हे देशामध्ये पर्यटन आणि औद्योगिक दृष्ट्या आघाडीवर आहे. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्र आहे. अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पण, औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमान तळावरून देशातील इतर शहरात जाण्यासाठी विमान सेवेची सुविधा मात्र कमी प्रमाणात आहे.

परिणामी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांवरती मोठा परिणाम होत आहे. त्यानुषंगाने पर्यटकांना विमान सेवा, सोयी सुविधा देण्यासाठी आजची बैठक महत्त्वपूर्ण राहिली. या बैठकीमध्ये देशातील विविध शहरांना विमान सेवा पुरविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

औरंगाबादहून गोवा, बेंगलोर, अहमदाबाद, पुणे, नागपूर, नांदेड, इंदोर, चेन्नई, जयपूर आदी शहरांमध्ये हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत या हवाई सेवा देण्यासंदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT