PFI Office Seal In Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : सर्वाधिक १७ कार्यकर्ते अटक झालेल्या पीएफआयचे कार्यालय सील..

देशविघातक व देशद्रोही कटाचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेचे पाळेमुळे खणून काढण्यात केंद्रीय तपास यंत्रणा व एटीएसला यश मिळाले होते. ( Aurangabad News)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : केंद्र सरकारने देशभरासह राज्यात व मराठवाड्यात चार दिवसांपुर्वी धडाकेबाज कारवाई करत शेकडो (Aurangabad) पीएफआय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. दहशतावदी संघटनेशी लागेबांधे सिद्ध झाल्यानंतर काल केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाचे स्वागत होत असतांना राज्यात सर्वाधिक पीएफआयचे कार्यकर्ते ज्या (Marathwada) औरंगाबादेतून अटक करण्यात आले होते, त्या शहरातील जिन्सी भागातील पीएफआयचे कार्यालय देखील आता (Police) पोलिसांकडून सील करण्यात आले आहे.

सील ठोकल्यानंतर या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. सील केल्यानंतर कार्यालयावर पोलिसांकडून नोटीस चिकटवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या सहीची ही नोटीस असून कार्यालय सगळ्या बाजूंनी सील करण्यात आले आहे. पीएफआयचे कार्यालय सील करण्याची राज्यातील पहिली कारवाई औरंगाबादेत करण्यात आली आहे.

देशविघातक व देशद्रोही कटाचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेचे पाळेमुळे खणून काढण्यात केंद्रीय तपास यंत्रणा व एटीएसला यश मिळाले होते. त्यानंतर या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. बंदीच्या कारवाईनंतर आता पीएफआयचे देशभरातील कार्यालये देखील सील केली जाणार आहेत.

त्याची सुरूवात राज्यात सर्वप्रथम औरंगाबादेतून करण्यात आली आहे. आठवडाभरापासून पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर करण्यात येत असलेल्या कारवायांमध्ये औरंगाबाद केंद्रबिंदू बनले होते. दोन टप्यात शहरातील विविध विभागात धाडी टाकून तपास यंत्रणांनी एकून १७ जणांना अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT